Haldi Kunku Invitation Format in Marathi: मकर संक्रातीच्या हळदी कुंकू समारंभासाठी 'निमंत्रण पत्रिका' WhatsApp, SMS द्वारा शेअर करत द्या आमंत्रण

Makar Sankranti Haldi Kunku Invitation Format in Marathi: मकर संक्रातीच्या हळदी कुंकू समारंभासाठी तुमच्या मैत्रिणींना आमंत्रित करणार असाल तर या खास आमंत्रण पत्रिकेच्या नमुन्यांचा वापर करून WhatsApp द्वारा, SMS द्वारा निमंत्रण देऊ शकता.

Haldi Kunku Invitation Format in Marathi: मकर संक्रातीच्या हळदी कुंकू समारंभासाठी 'निमंत्रण पत्रिका' WhatsApp, SMS द्वारा शेअर करत द्या आमंत्रण
Haldi Kunku Invitation Format in Marathi: Invitation for Makar Sankranti Haldi Kunku Ceremony by sharing '  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नवीन वर्षात जानेवारी महिन्यातला पहिला सण हा मकर संक्रांतीचा
  • या सणाला हळदी कुंकवाला वाण लुटण्याची रीत
  • आमंत्रण पत्रिकेच्या नमुन्यांचा वापर करून WhatsApp द्वारा, SMS द्वारा निमंत्रण

Makar Sankranti Haldi Kunku Invitation Format in Marathi: नवीन वर्षात जानेवारी महिन्यातला पहिला सण हा मकर संक्रांतीचा साजरा केला जातो. या सणानिमित्त महिलांमध्ये तर मोठा उत्साह असतो. तर नववधूंसाठी हा सण खास असतो. या सणाला हळदी कुंकवाला वाण लुटण्याची रीत असते. त्यामुळे घरोघऱी हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले जातात. मग यंदाही हळदी कुंकवासाठी तुमच्या मैत्रिणींना आमंत्रित करणार असाल तर या खास आमंत्रण पत्रिकेच्या नमुन्यांचा वापर करून WhatsApp द्वारा, SMS द्वारा निमंत्रण देऊ शकता. (Haldi Kunku Invitation Format in Marathi: Invitation for Makar Sankranti Haldi Kunku Ceremony by sharing 'Nimantran Patrika' via WhatsApp, SMS)

हळदी कुंकू आणि वाण देण्याचा कार्यक्रम मकरसंक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत कधीही आयोजित केला जाऊ शकतो. यंदा मकर संक्रात 14 जानेवारी दिवशी तर रथसप्तमी हा सण 28 जानेवारी दिवशी आहे. त्यामुळे या दिवसांत हळदी कुंकवानिमित्त महिलांची गडबड सुरू राहणार आहे. 


मकरसंक्रांत हळदी कुंकू समारंभ आमंत्रण


दरवर्षी प्रमाणे यंदाही सोसायटीमधील सार्‍या महिलावर्गासाठी

मकरसंक्राती मधील हळदी कुंकवाचं आयोजन करण्यात आले आहे.

तरी आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होत त्याची शोभा वाढवावी

विनित,

दिनांक-

स्थळ -

मकर संक्रांतीचा सण गोडवा जपण्याचा, ऋणानुबंध वाढवण्याचा

मग नववर्षातील या पहिल्या सणानिमित्त सार्‍या एकत्र येऊन

साजरा करू सोहळा खास हळदी कुंकवाचा

नवीन वर्षाच्या, नवीन सणाच्या

शुभेच्छा देऊ गळाभेट घेत मकरसंक्रांतीच्या!

मकर संक्रांतीनिमित्त 15 जानेवारी दिवशी आयोजित हळदी-कुंकू सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नक्की घरी या आणि वाण लूटण्याचा आनंद घ्या

पत्ता-

मकरसंक्रांतीला अनेकजणी काळी साडी नेसून हा सण साजरा करतात. त्यासोबतच हलव्याचे दागिने बनवून ते परिधान करण्याची देखील पद्धत आहे. नवीन लग्न झालेल्या जावयाचे देखील या सणानिमित्त कोडकौतुक केले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी