Hanuman Jayanti 2022: शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीचा दिवस आहे खूप खास, हे उपाय केल्यावर मिळेल मोक्ष

चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. यावेळी 16 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा किंवा हनुमान जयंती साजरी केली जाणार. हनुमानजींची जयंती देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.

Hanuman Jayanti is a very special day
हनुमान जयंतीचा दिवस आहे खूप खास  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • धार्मिक मान्यतेनुसार शनिवार हा दिवस हनुमान आणि शनिदेवाच्या पूजेसाठी शुभ मानला जातो.
  • हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीला केवडा अत्तर आणि गुलाबाची माळ अर्पण करावी.

मुंबई : चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. यावेळी 16 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा किंवा हनुमान जयंती साजरी केली जाणार. हनुमानजींची जयंती देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यावेळी हनुमान जयंती शनिवारी असल्याने ती आणखीनच खास झाली आहे. धार्मिक मान्यतेनुसार शनिवार हा दिवस हनुमान आणि शनिदेवाच्या पूजेसाठी शुभ मानला जातो. या दिवशी शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय करणे फायदेशीर ठरते. शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी कोणते उपाय केले जाऊ शकतात. याची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.. 

हनुमान जयंतीला शनिदोषापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय

हनुमानजीसमोर दिवा लावा- 

असे मानले जाते की हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीला केवडा अत्तर आणि गुलाबाची माळ अर्पण करावी. तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावून 11 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा. असे केल्याने  हनुमानजींचा आशीर्वादही प्राप्त होतोच शिवाय शनिदेवापासून मुक्ती मिळते. 

राम रक्षा स्त्रोत का पाठ करें:

हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात श्री राम, माता सीता आणि हनुमानजींच्या मूर्तींचे दर्शन घेतांना, रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने बजरंगबालीचा आशीर्वाद मिळतो. यासोबतच शनिदेवाची कृपाही प्राप्त होते. साधकाची सर्व कामे स्वतःच होऊ लागतात.

एक सिंदूर लावा :

असे मानले जाते की हनुमानजींना सिंदूर खूप प्रिय आहे. त्यामुळे संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला सिंदूर अर्पण करा. यामुळे बजरंगबली प्रसन्न होतो आणि त्याला आरोग्य, सुख आणि समृद्धी देतात. एवढेच नाही तर शनिदेवाचा प्रकोपही कमी होतो.

नारळाचा उपाय आहे प्रभावी :

जर तुम्हाला कोणत्या कामात अडथळा येत असेल, तुमच्यावर काही काळी नजर असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात नारळ घेऊन जावे आणि ते स्वत वरुन सातवेळा उतरावे.  त्यानंतर ते नारळ मंदिरासमोर फोडावे, असं केल्यानं आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात. 

पिपळाच्या पानांचा उपाय:

या दिवशी हनुमानजींना गुलाबाची माळ अर्पण करा. तसेच 11 पिंपळाच्या पानांवर श्री रामाचे नाव लिहून त्यांची माळ बनवून हनुमानजींना अर्पण करा. असं केल्याने बजरंगबलीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि शनिदेवाचा त्रास कमी होत असतो. 

Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  टाइम्स नाउ कोणत्याही प्रकारच्या विश्वासाला, माहितीला दुजोरा देत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी