Anant Chaturdashi 2020: अनंत चतुर्दशीनिमित्त शुभेच्छापत्रं, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsapp Quotes on Anant Chaturdashi 2020: आज (१ सप्टेंबर) अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांना अनंत चतुर्दशीनिमित्त खास शुभेच्छा, मेसेज पाठवू शकतात.

Ganpati Anant chaturdashi
अनंत चतुर्दशीनिमित्त शुभेच्छापत्रं, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज  |  फोटो सौजन्य: Times Now

Anant Chaturdashi 2020 whatsApp Marathi wishes and Messages: यंदा २२ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला (Ganeshotsav) सुरुवात झाली. आता गणेशोत्सवाचे अकरा दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे आता अकरा दिवसाच्या गणेशोत्सवाची आज सांगता आहे. आज (१ सप्टेंबर) अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) आहे. याच दिवशी गणपतीचं विसर्जन करण्यात येणार आहे. श्रीगणेशाला ज्ञान, समृद्धी आणि सौभाग्यची देवता म्हणून पूजले जाते. गणेश चतुर्थीचा उत्सव गणेशोत्सवापासून अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजे साधारण १० दिवस साजरा केला जातो. यंदा अनंत चतुर्दशी १ सप्टेंबरला आहे. यंदा हा उत्सव ११ दिवस आहे. 

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चौदाव्या दिवशी अनंत चतुर्दशी असते. हा सण उत्सव आणि बंधुतेचे प्रतिक आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची (Lord Vishnu) पूजा केल्यानंतर हातावर एक धागा बांधला जातो. हा धागा रेशमाचा किंवा सुती असू शकतो आणि यात १४ गाठी असाव्या लागतात. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाची सांगता देखील याच दिवशी होते. कारण अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणपती विसर्जनही (Ganesh Visarjan) केले जाते.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाणारे व्रतही महत्वपूर्ण असते. हे सर्व या सर्वांना प्रसन्न करण्यासाठी आणि आनंदी आणि संतुष्ट जीवनाच्या प्राप्तीसाठी केले जाते. यादिवशी उपवासासह विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. हे व्रत धन, प्रचुरता आणि समृद्धीच्या प्राप्तीसाठी केले जाते. पर्याप्त धन, आनंद आणि संतानाच्या प्राप्तीसाठीही हे व्रत भारताच्या अनेक राज्यांमध्ये करतात. यादिवशी विष्णूच्या कथाही ऐकल्या जातात.

दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप दिला जातो. यावेळी मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघतात. मुंबई-पुण्यात तर या मिरवणुका अनेक तास चालतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने हा उत्सव साधेपणा साजरा करण्यात यावा असं स्वत: मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.

असं असलं तरीही आपण अनंत चतुर्दशीचा उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका. आपण कोरोना संसर्गामुळे एकत्र येऊ शकलो नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला नक्कीच देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Anant Chaturdashi wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  

अनंत चतुर्दशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Instagram @LalbaugchaRaja)

ॐ भद्रं कर्णेभि शृणुयाम देवा:।
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:।।

अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Instagram @LalbaugchaRaja)

त्वं वाङग्मयचस्त्वं चिन्मय।
त्वं वाङग्मयचस्त्वं ब्रह्ममय:।।

अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Instagram @LalbaugchaRaja)

त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।

अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Instagram @LalbaugchaRaja)

एकदंताय विद्महे। वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदंती प्रचोद्यात।।
एकदंत चतुर्हस्तं पारामंकुशधारिणम्।।

अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Instagram @LalbaugchaRaja)

नाद: संधानं।। संहिता संधि: सैषा गणेश विद्या।।
गणक ऋषि: निचृद्रायत्रीछंद:।। ग‍णपति देवता।।

अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Instagram @LalbaugchaRaja)

नमस्तेऽस्तु लंबोदारायैकदंताय विघ्ननाशिने शिव सुताय।
श्री वरदमूर्तये नमोनम:

अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Instagram @LalbaugchaRaja)

ॐ यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्। इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च ॥

अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा! 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी