Happy Dussehra 2020: दसऱ्यानिमित्त मराठी शुभेच्छापत्रं, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज 

Happy Dussehra 2020 messages: दसऱ्यानिमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना शुभेच्छा देणारे मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहूयात सोशल मीडियात व्हायरल होणारे हे खास मेसेजेस...

Happy Dussehra 2020 messages
दसऱ्याच्या शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: Instagram

Happy Dussehra 2020 messages: नवरात्रीनंतर दशमीच्या दिवशी विजयादशमी (Vijayadashmi) म्हणजेच दसरा (Dussehra) हा सण साजरा करण्यात येतो. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा साजरा करण्यात येतो. तिथिनुसार आज (२५ ऑक्टोबर २०२०) दसरा साजरा करण्यात येणार आहे. दसऱ्याच्या दिवशी सरस्वती देवी आणि शस्त्रांची पूजा करण्यात येते. तसेच आपट्याच्या झाडाची पाने एकमेकांना वाटण्यात येतात आणि शुभेच्छा सुद्धा दिल्या जातात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांना भेटून शुभेच्छा देता येत नसल्या तरी तुम्ही फेसबूक, व्हॉट्सअॅप, मेसेजेच्या माध्यमातून आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, प्रियजनांना शुभेच्छा देऊ शकतात. सोशल मीडियात व्हायर होणारे असेच दसऱ्याच्या शुभेच्छा देणारे काही मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या मेसेजेसच्या द्वारे द्या दसऱ्याच्या शुभेच्छा.

आज (विजयादशमीची) पूजा करण्यासाठी विजय मुहूर्त हा दुपारी २ वाजून १७ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३ मिनिटांपर्यंत आहे. या वेळेत तुम्ही सरस्वती देवी आणि आपल्या घरातील शस्त्रांची पूजा करु शकता. ही पूजा केल्यावर आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या.

पाहूयात सोशल मीडियात व्हायरल होणारे काही मेसेजेस

(फोटो सौजन्य: इंस्टाग्राम)

तोरण बांधू दारी...
रांगोळी काढू अंगणी 
उधळण करु सोन्याची 
नाती जपू मना-मनांची...

विजयादशमीच्या शुभेच्छा 

(फोटो सौजन्य: इंस्टाग्राम)

आपट्याची पाने, 
झेंडुची फुले, 
घेवूनी आली विजयादशमी 

दसऱ्याच्या आज शुभ दिनी, 
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी...

दसऱ्याच्या गोड गोड शुभेच्छा

(फोटो सौजन्य: इंस्टाग्राम)

दसरा
या दिवशी म्हणे सोनं वाटतात...
एवढा मी श्रीमंत नाही...
पण नशीबानं तुम्ही सोन्यासारखी 
माणसं मला मिळाली... 
सोन्यासारखे तर तुम्ही आहातच...
सदैव असेच राहा...

माझ्याकडून दसऱ्याच्या शुभेच्छा 

(फोटो सौजन्य: इंस्टाग्राम)

हा दसरा तुम्हाला 
आनंदाचा, भरभराटीचा, वैभवाचा, 
आरोग्यदायक आणि मंगलमय जावो 
हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना... 

दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा 

(फोटो सौजन्य: इंस्टाग्राम)

तुमचे सर्वांचे आयुष्य 
सुखी, समृद्धी, आनंदी, आरोग्यमय
दीर्घआयुष्य, यशदायी, शांततामय जावो

तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या शुभेच्छा 
|| शुभ दसरा ||

(फोटो सौजन्य: इंस्टाग्राम)

सोनेरी दिवस, 
सोनेरी पर्व, सोनेरी क्षण, 
सोनेरी आठवणी, 
सोनेरी शुभेच्छा फक्त 
सोन्याहून अनमोल लोकांना 

दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा

(फोटो सौजन्य: इंस्टाग्राम)

लाखो किरणांनी उजळल्या दिशा, 
घेऊनी नवी उमेद, नवी आशा, 
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा 

दसऱ्याच्या शुभेच्छा 

(फोटो सौजन्य: इंस्टाग्राम)

आला आला दसरा 
समस्या सर्व विसरा
विचार करु नका दुसरा 
चेहरा ठेवा नेहमी हसरा 

दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी