Eid Mubarak 2022 Messages: रमजान ईदच्या शुभेच्छा Wishes, Quotes, WhatsApp Status

Eid Mubarak 2022 Marathi Messages ।  रमजान महिना मुस्लिम बांधवांमध्ये सर्वांत पवित्र महिना मानला जातो, या मध्ये चंद्रदर्शनाला अनन्य साधारण महत्व आहे.

happay eid mubarak 2022 marathi messages through wishes quotes whatsapp status to send your family and friends
रमजान ईदच्या शुभेच्छा द्या मुस्लिम बांधवांना  
थोडं पण कामाचं
  • रमजान महिना मुस्लिम बांधवांमध्ये सर्वांत पवित्र महिना मानला जातो, या मध्ये चंद्रदर्शनाला अनन्य साधारण महत्व आहे. 
  • रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्रदर्शन झाल्यावर ईद संपूर्ण जगभरात साजरी केली जाते.
  • मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-फित्र म्हणजेच “रमजान ईद” असे म्हणतात.

Eid Mubarak 2022 Marathi Messages ।  रमजान महिना मुस्लिम बांधवांमध्ये अत्यंत पवित्र महिना मानला जातो, या मध्ये चंद्रदर्शनाला अनन्य साधारण महत्व आहे.  रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्र दिसल्यावर ईद संपूर्ण जगभरात साजरी केली जाते. त्याला मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-फित्र म्हणजेच “रमजान ईद” असे म्हणतात.

रमजान ईदला संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, त्यानिमित्त खाद्यपदार्थांची मेजवानी असते. या दिवशी शेवया, दूध, आणि सुक्यामेव्या पासून बनवलेल्या शीर खुरमाचे विशेष महत्त्व असते. तसेच बरेचसे लोक या दिवशी हज यात्रेला जाण्याचे सुद्धा नियोजन करतात. हज यात्रा ही प्रत्येक मुस्लमानासाठी खूप खास विषय आहे. 

या दिवशी मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीमध्ये जावून नमाज पठण करतात म्हणजेच अल्लाहची प्रार्थना करतात आणि त्या नंतर आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना विशिष्ट प्रकारची मिठी मारून ईदच्या शुभेच्छा देतात.

 रमजान म्हणजे 'बरकती' आणि ईद म्हणजे 'आनंद' असा हा बरकतीचा आनंद साजरा केला जातो.  या मोठ्यांकडून लहानांना ईदी दिली जाते.  लहान मुलांसाठी हा खूप आनंदाचा सण असतो.   मनामनातील दरी कमी करुन परस्परांमध्ये स्नेहभाव वाढविणारा रमजान  हा पवित्र  महिना मानला जातो. याच महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबरांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश्चर्या फलीत झाली होती.  अर्थात त्यामुळे त्यांना अल्लाहचा साक्षात्कार झाला होता. ़ॉ

 मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला असे सांगितले जाते. रमजान ईद (Ramzan Eid) या दिवसाला 'ईद-उल-फित्र' (Eid al-Fitr) असेही म्हणतात. यंदा हा सण 3 मे रोजी सर्वत्र साजरा केला जाईल. या दिवशी सर्वजण एकमेकांना शुभेच्छा पाठवू शकता.

रमजान ईद दिवशी मुस्लिम बांधव एकमेकांना गळाभेट देऊन एकमेकांना ईदी देतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट होते. पण यंदा मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात ईद साजरी करणार आहेत. 

रमजान ईदचे मराठी मेसेज 

Eid Mubarak 2021 Marathi Messages

Eid Mubarak 2022 Messages: Photo । BCCL 

“अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा,

तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा,

सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा…

ईद मुबारक!”

.................


ईद घेऊन येई आनंद

जोडू मनामनांचे बंध

सणाचा हा दिवस खास

ईद मुबारक तुम्हा सर्वांस

रमजान ईद मुबारक!

Eid Mubarak 2021 Marathi Messages

Eid Mubarak 2022 Messages: Photo । BCCL 


“बंधुत्वाचा संदेश देऊया,

विश्व बंधुत्व वाढीस लावूया,

रमजान ईद दिवशी हीच धरुनी मनी इच्छा,

सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा…

ईद मुबारक!”

Eid Mubarak 2021 Marathi Messages

Eid Mubarak 2022 Messages: Photo । BCCL 


“धर्म, जात – पात यापेक्षाही

मोठी असते शक्ती माणुसकीची…

एकमेकांची गळाभेट घेऊन

शुभेच्छा देऊयात रमझान ईदची…

ईद मुबारक!”

Eid Mubarak 2021 Marathi Messages

Eid Mubarak 2022 Messages: Photo । BCCL 

“रमजान ईद निमित्त

तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य,

सुख संपत्ति लाभो ईदच्या

सर्वांना खूप खूप शुभेच्छा

ईद मुबारक!”

Eid Mubarak 2021 Marathi Messages

Eid Mubarak 2022 Messages: Photo । BCCL 

“तेरी ईद मैं मना लूँ, मेरी मना ले तू दिवाली…!

छोड़ दे सब फसादों को,

देश में होने दे खुशहाली..

सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा…!!!”

Eid Mubarak 2021 Marathi Messages

Eid Mubarak 2022 Messages: Photo । BCCL 

“तुम्हाला आणि तुमच्या परिवारला आनंदाने भरलेली ही ईद मुबारक!”

Eid Mubarak 2021 Marathi Messages

Eid Mubarak 2022 Messages: Photo । BCCL 

माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना

रमजान ईदच्या मनापासून

हार्दिक शुभेच्छा...

अल्लाह ताला आपकी जिंदगी की हर ख्वाईश,

हर तमन्ना, हर आरजू, हर खुशी, पुरी कराये…

आमीन!

ईद मुबारक!

“तुमच्या जीवनात कधी सुखाची कमी नसो, तुमचा प्रत्येक दिवस ईद पेक्षा कमी नसो, सर्वाना रमजान ईद च्या मनापासून शुभेच्छा!”

यंदाची रमजान ईद  तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला

सुख, शांती, समृद्धी आणि आनंद  घेऊन येवो

हिच आमची सदिच्छा

ईद उल-फ़ित्रच्या हार्दिक शुभेच्छा!


या ईदच्या सणाला आपण आणखी सुंदर रित्या साजरे करू शकतो, जर आपल्या आजूबाजूला आपल्याला कोणी उपाशी दिसला तर आपण त्यांची मदत करूया.. या ईदला बाकी सणांपेक्षा वेगळं बनुयात. आपण जगाला दाखवून देऊयात सुजाण नागरीक कसे असतात तर, टाइम्स नाऊ मराठीच्या टीम कडून आपणास आणि आपल्या परिवारास ईदच्या हार्दिक शुभेच्छा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी