Ganesh Chaturthi 2020 Wishes, WhatsApp Messages: गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छापत्रं, Facebook आणि Whatsapp मेसेज

Ganesh Chaturthi Wishes, WhatsApp Messages,Quotes: गणेशोत्सवाला २२ ऑगस्ट २०२० रोजीपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे आपण आपल्या मैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुढील मेसेज पाठवू शकतात.

Ganpati Bappa
गणपती बाप्पा मोरया  |  फोटो सौजन्य: Times Now

Ganesh Chaturthi 2020 Wishes, WhatsApp Messages, SMS, Quotes: राज्यात गणेशोत्सवाला २२ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण अशी गणेशोत्सवाची ओळख आहे. घरगुती गणेशोत्सवाशिवाय सार्वजनिक गणपती उत्सव देखील राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदा २२ ऑगस्ट २०२० रोजी गणेश चतुर्थीपासून (Ganesh Chaturthi 2020) गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. श्रीगणेशाला ज्ञान, समृद्धी आणि सौभाग्यची देवता म्हणून पूजले जाते. असे मानले जाते की, श्री गणेशाचा जन्म भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात झाला होता. त्यामुळे या महिन्यात गणेशोत्सव साजरा केला जातो.  

गणेश चतुर्थीचा हा उत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजे साधारण १० दिवस साजरा केला जातो. मात्र, यंदा अनंत चतुर्दशी ही १ सप्टेंबरला असणार आहे. त्यामुळे यंदा हा उत्सव ११ दिवस चालणार आहे. 

श्रीगणेशाची विधिवत वस्त्र आणि उपनयन सजवून तसेच उचित आसन देऊन पूजा केली जाते. त्यानंतर प्राण प्रतिष्ठापना केली जाते. मध्यान्ह काळात विधीवत गणेश पूजन केले जाते. या दिवशी महाराष्ट्रातील घरात तसेच सार्वजनिक मंडळात सजावट केली जाते. . गणेश चतुर्थीवर गणेश प्रतिष्ठापना आणि गणेश पूजन दिवसाच्या मध्य भागात केले जाते. वैदिक ज्योतिष यांच्यानुसार गणेश पूजेसाठी हा सर्वात उपयुक्त कालवधी मानला जातो. मध्यान्ह दरम्यान गणेश भक्त गणेशाची प्राण प्रतिष्ठापना करतात. त्याला षोडशोपचार गणेश पूजनात मानले जात होते. 

दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र यंदा  कोरोनाचे सावट असल्याने हा उत्सव साधेपणा साजरा करण्यात यावा असं स्वत: मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. जे कोरोना संसर्ग पाहता योग्यच आहे. 

मात्र, असं असलं तरीही आपण गणेशोत्सवाचा उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका. आपण कोरोना संसर्गामुळे एकत्र येऊ शकलो नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला नक्कीच देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Ganesh Chaturthi wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

(फोटो सौजन्य: Instagram)

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ:।
निर्विघ्नं कुरु मे देव: सर्वकार्येषु सर्वदा॥

गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: Instagram)

जीव जडला चरणी तुझिया
आधी वंदू तुज मोरया

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: Instagram)

मोरया मोरया मी बाळ तान्हे ।
तुझीच सेवा करू काय जाणे ।।
अन्याय माझे कोट्यानुकोटी ।
मोरेश्वरा बां तू घाल पोटी ।। 

गणपती बाप्पा मोरया ।

(फोटो सौजन्य: Instagram)

देवा तूंचि गणेशु ।
सकलमतिप्रकाशु ।

मंगलमूर्ती मोरया! 

(फोटो सौजन्य: Instagram)

गजानना गजानना पार्वतीनंदन गजानना 
विघ्न विनाशक एकदंताय गौरीपुत्रा गजानना

गणेश चतुर्थीच्या खूप-खूप शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: Instagram)

साष्टांग नमन माझे, गौरी पुत्रा विनायका

गणपती आगमनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा 

(फोटो सौजन्य: Instagram)

एकदंताय विद्महे 
वक्रतुंडाय धीमहि
तन्नो दंती प्रचोदयात

गणेशोत्सवाच्या शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: Instagram)

तूच बुद्धिदाता, तूच पाठिराखा 
तूच गणाधीशा मोरया 

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: Times Now)

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची 
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची 

मोरया.... मोरया... 

(फोटो सौजन्य: Times Now)

घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा

गणपती आगमनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी