Kartiki Ekadashi 2020: कार्तिकी एकादशीनिमित्त शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsapp Quotes on Kartiki Ekadashi 2020: आज (२६ नोव्हेंबर) रोजी कार्तिकी एकादशी आहे. याचनिमित्ताने आपण आपल्या मित्र-मंडळींना शुभेच्छा आणि पुढील मेसेज पाठवू शकतात.

kartiki ekadashi
कार्तिकी एकादशीनिमित्त शुभेच्छा, Facebook-Whatsapp मेसेज  |  फोटो सौजन्य: Twitter

Kartiki Ekadashi 2020 whatsApp Marathi wishes and Messages: आज (२६ नोव्हेंबर) कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) साजरी करण्यात येत आहे. एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते, पंढरपूर, आळंदीमध्ये दाखल झालेल्या भक्तांची मांदियाळी, चंद्रभागा आणि इंद्रायणी काठ, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन बारीत भाबड्या भक्तांची आस. वर्षभरात येणाऱ्या २४ एकादशीमध्ये कार्तिकी एकादशीचे महत्त्व हे आषाढीप्रमाणेच आहे. कार्तिक महिन्यात येणाऱ्या एकादशीला 'कार्तिक एकादशी' असे म्हणतात. 

दरवर्षी कार्तिकी एकादशी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. पण यंदा कार्तिकी एकादशीवर देखील कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे यावेळी आपण एकत्र येणं टाळलं पाहिजे. मात्र असं असलं तरीही ऑनलाईनच्या युगात आपण कार्तिकी एकादशी आनंद नक्कीच घेऊ शकतो. तसेच एकमेकांना शुभेच्छा देखील आपण देऊ शकतो. 

दरवर्षी कार्तिकी एकादशीच्या सर्वत्र जल्लोषात साजरी केली जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे कार्तिक एकादशी साजरी करताना अनेक बंधनं पाळावी लागणार आहेत. मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे आपणा सर्वांना अनिवार्य आहेच. तसंच कुठेही गर्दी न करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच केलेलं आहे. त्यामुळे यंदा कार्तिकी एकादशी साधेपणाने साजरी करावी लागणार आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल डिस्टंसिंग पाळून आपण  WhatsApp, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवरुन शुभेच्छा संदेश, Messages, Wishes पाठवून तुम्ही कार्तिकी एकादशीचा उत्साह कायम राखू शकता. यासाठी काही खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, ग्रिटींग्स, शुभेच्छापत्रं...

राज्यातील विविध विठ्ठल मंदिरातही दरवर्षी कार्तिकी  एकादशीचा उत्सव साजरा केला जातो. यावेळी वेगवेगळ्या ठिकाणाहून  दिंडी काढली जाते. मात्र यंदा कोविड-19 दहशतीमुळे हे काही अनुभवता येणार नाही. असे जरी असेल तरी नाराज होण्याचे कारण नाही.कारण  सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण  WhatsApp, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवरुन शुभेच्छा संदेश, Messages, Wishes पाठवून तुम्ही कार्तिकी एकादशीचा उत्साह कायम राखू शकता. यासाठी काही खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, ग्रिटींग्स, शुभेच्छापत्रं... हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Kartiki Ekadashi wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.
  
द्या कार्तिकी एकादशीच्या खास शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

चला आळंदीला जाऊ। ज्ञानदेवा डोळा पाहु ॥
कार्तिकी एकादशी निमित्त सर्व मावळवासियांना हार्दिक शुभेच्छा!!

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

विटेवरी उभा नीट कटावरी कर ।
वाट पाहे निरंतर भक्‍ताची गे माये ।

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

कार्तिकीचा सोहळा | चला जाऊ पाहू डोळा ॥ आले वैकुंठ जवळा | सन्निध पंढरीये ॥  

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे || १ ||
डोळे तुम्ही घ्यारे सुख | पाहा विठोबाचे मुख || २ ||
तुम्ही आइका रे कान | माझ्या विठोबाचे गुण || ३ ||
मन तेथे धाव घेई | राही विठोबाचे पायी || ४ ||

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

भक्तीच्या वाटेत गाव तुझे लागले
आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले
तुझ्या प्रेमाचा झरा असाच कायम वाहू दे
माझ्या माणसांना, बळीराजाला सुखात राहू दे

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

आज कार्तिकी एकादशी, आळंदी यात्रा, तसेच माऊली महावैष्णव,कैवल्याचा पुतळा,श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा। वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।। 
पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा। चरणी वाहे भीमा उद्धरी जगा।

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

जीवाचिया जीवा प्रेमभावाचिया भावा । 
तुज वांचूनि केशवा अनु नावडे ॥ १ ॥
जीवें अनुसरलिये अझून का नये । 
वेगी आणा तो सये प्राण माझा ॥ २ ॥
सौभाग्यसुंदरु लावण्यसागरु ।
बापरखुमादेविवरु श्रीविठ्ठलु ॥ ३ 

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

सावळे सुंदर रूप मनोहर ।
राहो निरंतर हृदयी माझे ।।

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी