Happy Janmashtami Marathi Wishes 2022 : मुंबई :श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णाचा जन्म झाला. देवकीच्या आठवा गर्भ तुझा वध करणार अशी आकाशवाणी कंसाला झाली. म्हणून जेव्हा कृष्णाचा जन्म झाला तेव्ह वसुदेवाने कुष्णाला गोकुळात यशोदाकडे सोडले. श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार आहे. श्रीकृष्णाने भागवतधर्माची स्थापना केली. आज या श्रीकृष्णाचा जन्म दिन आहे. या निमित्ताने आपल्या मित्र मैत्रीणींना आणि नातेवाईकांना मराठीतून शुभेच्छा द्या.
बालवयातील कृष्ण कन्हेय्याच्या सांगितलेल्या कहाण्यांमध्ये त्याच वर्णन नटखट, माखनचोर असं आहे. त्यामुळे या दिवशी दूध, दह्याचे पदार्थ बनवले जातात. सण आणि उत्सवाच्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपात जागोजागी दहीहंड्या फोडल्या जातात. आता दहीहंडी हा सण देखील परंपरा जपत पण तरीही एका खेळाप्रमाणे खेळवला जातो.
राधेची भक्ती, बासरीची गोडी
लोण्याचा स्वाद आणि गोपींचा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमीचा दिवस खास.
जसा आनंद नंदच्या घरी आला,
तसा तुमच्या आमच्याही येवो,
प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा"
लोणी चोरून ज्यांनी खाल्ले
बासरी वाजून ज्यांनी नाचवले
आनंद साजरा करूया त्यांच्या वाढदिवशी
ज्यांनी जगाला सत्य आणि प्रेम शिकवले.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
कृष्ण ज्याचं नाव, गोकुळ ज्याचं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला, आमचा शतश: प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा