Mahavir Jayanti 2022 Wishes, Images, Quotes: महावीर जयंती निमित्त मराठमोळे Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images शेअर करून जैन बांधवांना द्या खास शुभेच्छा!

Happy  Mahavir Jayanti 2022 Wishes Images, Quotes, Status, Messages in Marathi: लोक महावीर जयंतीच्या दिवशी एकमेकांना महावीर जयंती शुभेच्छा, कोट्स आणि मेसेज पाठवून महावीर जयंतीच्या शुभेच्छा देतात. तुम्हीदेखील महावीर जयंती निमित्त मराठमोळे Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images शेअर करून जैन बांधवांना खास शुभेच्छा देऊ शकता.

Happy Mahavir Jayanti 2022 Wishes Images Quotes Status Messages in Marathi Download and send these wishes
Happy Mahavir Jayanti 2022 Wishes Images: महावीर जयंती निमित्त मराठमोळे Messages  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • यावर्षी १४  एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी करण्यात येणार आहे.
 • हा दिवस भगवान महावीरांचा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो.
 • हिंदू कॅलेंडरनुसार, भगवान महावीरांचा जन्म चैत्र महिन्याच्या 13 व्या दिवशी झाला होता.

Happy  Mahavir Jayanti 2022 Wishes Images, Quotes: यावर्षी १४  एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस भगवान महावीरांचा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, भगवान महावीरांचा जन्म चैत्र महिन्याच्या 13 व्या दिवशी झाला होता. त्यांचा जन्म बिहारमधील कुंडग्राम / कुंडलपूर या राज कुटुंबात झाला होता. त्यांना जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर मानले जाते. तपश्चर्याद्वारे ज्ञान प्राप्त झालेल्या 24 लोकांपैकी महावीर हे एक आहेत. भगवान महावीर यांनी आपल्या इंद्रिय आणि भावनांवर पूर्णपणे विजय मिळविला होता.

देशभरातील जैन मंदिरांमध्ये या दिवशी भगवान महावीरांची पूजा केली जाते. तसेच शोभा यात्रादेखील काढली जाते. या दिवशी जैन समाजातील लोक स्वामी महावीरांचा जन्म दिवस साजरा करतात. भगवान महावीरांनी जगाला सत्य, अहिंसेची शिकवण दिली. त्यांनी जैन धर्माचे अहिंसा, सत्य, अपरीग्रह, अचौर्य (अस्थेय) आणि ब्रह्मचर्य हे पंचशील तत्वे सांगितले.

महावीर जयंतीच्या दिवशी महावीरांची रथयात्रा काढली जाते आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीची माहिती लोकांना दिली जाते. तसेच लोक या दिवशी एकमेकांना महावीर जयंती शुभेच्छा, कोट्स आणि मेसेज पाठवून महावीर जयंतीच्या शुभेच्छा देतात. तुम्हीदेखील महावीर जयंती निमित्त मराठमोळे Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images शेअर करून जैन बांधवांना खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी आपल्याला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील.

महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

mahavir Jayanti 2022 HD Images


संपूर्ण जगाला अहिंसा, दया,

क्षमा, शांती, मैत्री,

जगा आणि जगू द्या हा

संदेश देणारे भगवान महावीर

यांना जयंती निमित्त अभिवादन!

mahavir Jayanti 2022 HD Images 1

जगा आणि जगू द्या हा

संदेश देणारे भगवान महावीर

यांच्या स्मृतीस

जयंती निमित्त अभिवादन!

mahavir Jayanti 2022 HD Images 2

अरिहंतांची बोली, सिद्धांचा सारांश

शिक्षकांचा धडा, संतांची संगत

अहिंसेचा प्रचार,

महावीर जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा!

mahavir Jayanti 2022 HD Images 3
रागावर शांतीने विजय मिळवा,

दुष्टांनवर दयाळूपणाने विजय मिळवा,

आणि असत्यावर सत्यांनी विजय मिळवा!

महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

mahavir Jayanti 2022 HD Images 4
तुमच्या आत्म्या इतका मोठा

तुमचा कोणताही शत्रू नाही.

वास्तविक शत्रू तुमच्या आत आहे,

तो शत्रू राग,गर्व, लोभ,आणि द्वेष

च्या रुपात आहेत.

महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

mahavir Jayanti 2022 HD Images 5

अहिंसेचा मार्ग दाखवून

जगाला प्रेमाची शिकवण देणारे

जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर

महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त

विनम्र अभिवादन

mahavir Jayanti 2022 HD Images 6


अहिंसा परमो धर्मः

धर्म हिंसा तथैव च: l

महावीर जयंती निमित्त

जैन बांधवाना खूप खूप शुभेच्छा

mahavir Jayanti 2022 HD Images 7
अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री ची शिकवण देणाऱ्या

महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त

त्रिवार अभिवादन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी