Naraka Chaturdashi 2020: नरक चतुर्दशीनिमित्त शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsapp Quotes on Naraka Chaturdashi 2020: यंदा १२ नोव्हेंबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. त्यामुळे आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या आणि नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा आणि पुढील मेसेज पाठवू शकतात.

Narak Chaturdashi photo 2020
नरक चतुर्दशीनिमित्त शुभेच्छा, Facebook-Whatsapp मेसेज   |  फोटो सौजन्य: Twitter

Naraka Chaturdashi 2020 whatsApp Marathi wishes and Messages: दिवाळीतील (Diwali) सर्वात महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे नरक चतुर्दशी. (Naraka Chaturdashi) दिवाळीची खरी सुरुवात याच मुहूर्तापासून होते. यंदा दिवाळीच्या तिसऱ्या नरक चतुर्दशी असणार आहे. तसंच याच दिवशी यंदा लक्ष्मीपूजन देखील असणार आहे. काही वेळेस मुहुर्तानुसार हे दोन्ही सण वेगवेगळ्या दिवशी असतात. मात्र यंदा हे १४ नोव्हेंबरलाच म्हणजेच एकाच दिवशी असणार आहेत. यंदा दिवाळीच्या सणावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे आपल्याला रस्त्यावर एकत्र येऊन दिवाळी पहाट साजरी करता येणार नाहीए. पण असं असलं तरीही ऑनलाईनच्या युगात आपण नरक चतुर्दशीच्या आणि दिवाळी पहाटच्या शुभेच्छा तर देऊच शकतो. 

आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीलाच 'नरक चतुर्दशी' असं म्हणतात. पौराणिक आख्यायिकेनुसार, नरकासूर हा एक बलाढ्य असूर राज्य करीत होता. या नरकासुराचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत होता. तो सामान्यांना फारच त्रास देऊ लागला होता. जेव्हा नरकासुराच्या या तक्रारी श्रीकृष्णापर्यंत पोहचल्या तेव्हा त्याने सत्यभामेसह या नरकासुरावर आक्रमण करुन त्याचे पारिपात्य केले. ज्या दिवशी कृष्णाने नराकसुराचा वध केला तो दिवस होता आश्विन वद्य चतुर्दशी. म्हणून तेव्हापासून या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणून ओळखले जाते. याच दिवशी सूर्योदयापूर्वी लोक अभ्यंगस्नान करतात. तसेच कारटे फोडून प्रतिकात्मक नरकासुराचा वधही करतात. त्यानंतर गोडधोडाचा आस्वाद घेऊन दिवाळी सण साजरा करतात. 

दरवर्षी दिवाळीचा एक वेगळाच उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असतो. मात्र, यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे दिवाळी सण साजरी करताना आपल्यावर बरीच बंधनं असणार आहेत. यावेळी मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे अनिवार्य आहे. तसंच वायू प्रदूषण होऊ नये यासाठी फटाके देखील न फोडण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी साधेपणाने साजरा करावी लागणार आहे. 

मात्र, असं असलं तरीही आपण आपल्या दिवाळीचा उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका. आपण कोरोना संसर्गामुळे एकत्र येऊ शकलो नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला नक्कीच देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Naraka Chaturdashi wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  

द्या नरक चतुर्दशीच्या खास शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

दिवाळीची नवी पहाट घेऊन आली सुखाची नवी आशा, 
दुष्ट प्रवृत्तींचा संहार होऊन जगी उजळू दे तेजाची दिशा

नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

नरक चतुर्दशीच्या दिनी आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता नष्ट होऊन आपले आयुष्य तेजोमय होवो  
नरक चतुर्दशीच्या मंगलमय शुभेच्छा!

नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

सत्य प्रवृत्तीवर विजय मिळविल्याचा हा दिवस...  
आज नरक चतुर्दशीच्या निमित्ताने आपणही समाजातील 
दृष्ट प्रवृत्तीवर विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करुया.

नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

नरक चतुर्दशीच्या सुमुहूर्तावरी आयुष्यात आपुल्या, 
नवचैतन्याचे नवकिरण यावे...  

नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

कृष्णाने तारले जसे सोळा सहस्त्रांना 
आपले दुःख-दैन्यही तयाने तसेच हरावे... 

नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

अन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ आपल्याला लाभो
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो आपणांस स्वर्ग सुख नित्य लाभो... 
ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो

नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया
चतु : वर्ती समायु सर्वपापापनुत्तये

नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी