Navratri 9 colors 2020: आजचा रंग (निळा)- द्या नवरात्रीच्या शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsapp Quotes on Navratri 9 colors 2020: यंदा १७ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना नवरंगाच्या शुभेच्छा आणि पुढील मेसेज पाठवू शकतात.

happy navratri 9 colors 2020
आजचा रंग (लाल)- द्या नवरात्रीच्या शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज  |  फोटो सौजन्य: Instagram

Navratri 9 colors 2020 whatsApp Marathi wishes and Messages (Todays Colors Gray): यंदा १७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता आपल्याला दररोज नवरंगांची उधळण पाहायला मिळणार आहे. यावेळी दररोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करुन नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यामध्ये महिला वर्गाचा सहभाग जास्त असोत. यंदा नवरात्रोत्सवचा पहिला रंग हा करडा (Gray) होता. तर आता दुसरा रंग केशरी (Orange) होता. तिसरा रंग हा पांढरा (White) होता. चौथ्या दिवसाचा रंग हा लाल (Red) होत. तर आजचा म्हणजेच पाचव्या दिवसाचा रंग हा निळा (Blue) आहे. चला तर यानिमित्ताने आपणही आपल्या मित्र मंडळींना द्या विशेष शुभेच्छा  

दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यावेळी मोठ्या प्रमाणात दांडिया आणि गरबा खेळला जातो. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने हा उत्सव साधेपणा साजरा करण्यात यावा असं स्वत: मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे.

असं असलं तरीही आपण नवरात्रोत्सवाचा उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका. आपण कोरोना संसर्गामुळे एकत्र येऊ शकलो नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला नक्कीच देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Navratri wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  

द्या नवरंगाच्या खास शुभेच्छा!

५. पाचवा रंग - निळा

(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

आजचा रंग - निळा 
निळा रंग म्हणजे निष्ठा आणि आत्मविश्वास 
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

आजचा रंग - निळा 

निळा रंग हा शांती आणि सौम्यतेचं प्रतिक
सौम्य स्वभाव असणाऱ्यांना निळा रंग अधिकच आपलासा वाटतो
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

आजचा रंग - निळा 

निळ्या रंगाने सकारात्मक उर्जा निर्माण होतेय
सौम्यतेचं प्रतिक असलेला निळा रंग तणावही दूर सारतो...
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 

४. चौथा रंग - लाल 

नवरात्रीच्या खूप शुभेच्छा...

(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

लाल रंग हा प्रेमाचा रंग तर आहेच... पण जोश आणि उल्हासाचाही रंग हाच आहे. 
या रंगाप्रमाणेच आपला प्रेमळपणा अधिक वाढत जावो. 

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

लाल रंग म्हणजे आकांक्षा आणि आवेग! 

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 

३. तिसरा रंग - पांढरा

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

पांढरा रंग म्हणजे शुद्धता आणि शांती.. 

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

पांढरा रंग पावित्र्याचा, बुद्धीमत्तेचा 
द्योतक आहे...
नितळतेचं आणि निरागसतेचं प्रतिकही आहे.. 

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

२. दुसर  रंग - केशरी (ऑरेंज)

नवरात्रोत्सवाच्या आपणास आणि आपल्या परिवारास शुभेच्छा

आई अंबाबाईच्या कृपेने आपणास उत्तम आरोग्य, सुख, शांती, समाधान लाभो 

हिच महालक्ष्मी चरणी प्रार्थना

Happy Navratri 2020 

(फोटो सौजन्य: Instagram)

नवरात्रीच्या खूप शुभेच्छा... आजचा रंग - केशरी (ऑरेंज)

शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

Happy Navratri 2020 

(फोटो सौजन्य: Instagram)

१. पहिला रंग - करडा (१७ सप्टेंबर २०२०)

(फोटो सौजन्य - instagram)

नवरात्रीच्या खूप शुभेच्छा...  पहिला रंग - करडा (ग्रे)

आजपासून सुरु होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या

तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा... 

Happy Navratri 2020


(फोटो सौजन्य - instagram)

नवरात्रीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...  पहिला रंग - करडा (ग्रे)

आई जगदंबेची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबीयांवर कायम राहो 
आपलं जीवन आनंदमय आणि सुखमय होवो 

Happy Navratri 2020

(फोटो सौजन्य - instagram)

नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा...  पहिला रंग - करडा (ग्रे)

सर्व मंगल मांगल्ये 
शिवे सर्वार्थ साधिके 
शरण्य त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते... 

आपणा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा 

Happy Navratri 2020

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी