Navratri 9 colors 2020: आजचा रंग- हिरवा, द्या शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsapp Quotes on Navrang 9 colors 2020: यंदा १७ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना नवरंगाच्या शुभेच्छा पाठवू शकतात. जाणून घ्या आजचा रंग कोणता आहे:

Mansi Naik
आजचा रंग- हिरवा, द्या शुभेच्छा, Facebook आणि Whatsapp मेसेज  |  फोटो सौजन्य: Instagram

Navratri 9 colors 2020 whatsApp Marathi wishes and Messages (Todays Colors Green): नवरात्रोत्सवाला यंदा १७ ऑक्टोबरपासून  सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता आपल्याला नवनव्या रंगांची उधळण पाहायला मिळत आहे. यावेळी दररोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करुन नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यामध्ये महिला वर्गाचा सहभाग जास्त असतो. यंदा नवरात्रोत्सवचा पहिला रंग हा करडा (Gray) आहे. तर दुसऱ्या दिवसाचा रंग हा केशरी (Orange) होता तर तिसरा रंग पांढरा (White) होता. तर  चौथ्या दिवसाचा रंग हा लाल (Red) होता.  पाचव्या दिवसाचा रंग हा निळा (Blue) होता. तर सहाव्या दिवसाचा रंग हा पिवळा (Yellow)होता. तर आजचा (२३ ऑक्टोबर) रंग हा हिरवा (Green) आहे. चला तर यानिमित्ताने आपणही आपल्या मित्र मंडळींना द्या विशेष शुभेच्छा. 

दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो.  यावेळी मोठ्या प्रमाणात दांडिया आणि गरबा खेळला जातो. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने हा उत्सव साधेपणा साजरा करण्यात यावा असं स्वत: मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे.

असं असलं तरीही आपण नवरात्रोत्सवाचा उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका. आपण कोरोना संसर्गामुळे एकत्र येऊ शकलो नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला नक्कीच देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (navratri 9 colors wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  

द्या नवरंगाच्या खास शुभेच्छा!

नवरात्रीच्या खूप शुभेच्छा... आजचा रंग - हिरवा (Green)

(फोटो सौजन्य: अमृता खानविलकर इंस्टाग्राम)

आजचा रंग - हिरवा
शक्ती आणि समृद्धीचा रंग म्हणजे हिरवा 
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 

 

(फोटो सौजन्य: स्पृहा जोशी इंस्टाग्राम)

आजचा रंग - हिरवा
रंग हिरवा निर्सगाचा 
धरतीवरती होत असे 
भास हा स्वर्गाचा... 
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: उर्मिला कोठारे इंस्टाग्राम)

आजचा रंग - हिरवा
हिरवा रंग निसर्गाची ओळख 
समृद्धीचं प्रतिक... हिरवा म्हणजे लावण्य... 
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: जुई गडकरी इंस्टाग्राम)

आजचा रंग - हिरवा
हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी