Navratri 9 colors 2020: आजचा रंग (मोरपंखी)- द्या नवरात्रीच्या शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsappp Quotes on Navratri 9 colors 2020: नवरात्रोत्सवाला सर्वत्र सुरूवात झाली आहे. नवरात्रोत्सवात रंगांनाही विशेष महत्व असतं. जाणून घेऊया आजचा रंग कोणता आणि द्या शुभेच्छा...

Todays Color Peacock Green
आजचा रंग (मोरपंखी)- द्या नवरात्रीच्या शुभेच्छा,   |  फोटो सौजन्य: Instagram

Navratri 9 Colors 2020 whatsApp Marathi wishes and messages (Todays Color Peacock Green): नवरात्रोत्सवाला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. घटस्थापनेत दूर्गा मातेची पूजा करण्यासोबतच उपवासही करण्यात येतात. या नऊ दिवसांच्या काळात देवीला नऊ रंगांच्या साड्या नेसवल्या जातात. या नऊ रंगांना फार महत्व असते. खासकरुन महिला दररोज नवनवीन रंगानुसार पेहराव करतात. केवळ महिलाच नाही तर पुरुष सुद्धा त्या रंगांचे कपडे परिधान करत असल्याचं पहायला मिळतं. दरवर्षी नऊ दिवसांचे रंग हे आधीच ठरवण्यात येतात. या वर्षी पहिला रंग हा करडा (ग्रे) होता. आज शनिवारी म्हणजेच आठव्या दिवशीचा रंग मोरपंखी (Peacock Green) आहे.

रवर्षी नवरात्रोत्सवात एक वेगळाच उत्साह आणि आनंदाचे वातावरण असते. सर्वत्र देवीची पूजा-अर्चा केली जाते. मंदिरात आणि सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या मंडपात भजन तसेच इतर धार्मिक कार्यक्रम होतात. तसेच सायंकाळी दांडिया, गरबा आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येते. पण यंदा कोरोनाच्या सावटामुळे सर्वत्र साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. 

कोरोनाचं सावट असलं तरी नागरिक आपल्या घरी दुर्गा मातेची पूजा करत आहेत. तसेच नऊ दिवसांच्या रंगांप्रमाणे दरदिवशी वेगवेगळा पेहराव करत आहेत. यासोबतच आपल्या सहकाऱ्यांना नवरंगाच्या शुभेच्छा देतात. सोशल मीडियात व्हायरल होणारे असेच काही मेसेज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्ही सुद्धा आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना शुभेच्छा द्या.

आजचा रंग - मोरपंखी 

शांतता, हुशारी आणि प्रसन्नतेचा रंग म्हणजे मोरपंखी

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

(फोटो सौजन्य: इंस्टाग्राम)

आजचा रंग - मोरपंखी

रंग आत्मविश्वासाचा
रंग सामर्थ्याचा 
रंग स्वप्नांचा 

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

(फोटो सौजन्य: इंस्टाग्राम)

आजचा रंग - मोरपंखी

मोरपंखी हा रंग इच्छाशक्ती तसेच ध्येयपूर्तीचे प्रतीक 

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

(फोटो सौजन्य: इंस्टाग्राम)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी