Navratri 9 colors 2020: आजचा रंग- गुलाबी, द्या शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsapp Quotes on today colors 2020: आज दसरा म्हणजेच नवरात्रौत्सवाची सांगता त्यामुळे नवरंगाची देखील आज शेवटचा दिवस. त्यामुळे आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना आजच्या रंगाच्या शुभेच्छा आणि पुढील मेसेज पाठवू शकता

 pink Main
आजचा रंग- गुलाबी, द्या शुभेच्छा,Facebook आणि Whatsapp मेसेज (@सानिका बनारसवाले)  |  फोटो सौजन्य: Instagram

Navratri 9 colors 2020 whatsApp Marathi wishes and Messages (Todays Colors Pink): नवरात्रोत्सवाला यंदा १७ ऑक्टोबरपासून  सुरुवात झाली आणि त्याचा सांगता देखील होत आहे. गेले नऊ दिवस आपल्याला नवनव्या रंगांची उधळण पाहायला मिळत होती. यावेळी दररोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करुन नवरात्रोत्सव साजरा केला जात होता. आज नवरंगातील शेवटचा रंग आहे. यंदा नवरात्रोत्सवचा पहिला रंग हा करडा (Gray) होता. तर दुसऱ्या दिवसाचा रंग हा केशरी (Orange) होता. तर तिसरा रंग पांढरा (White) होता. तर  चौथ्या दिवसाचा रंग हा लाल (Red) होता.  पाचव्या दिवसाचा रंग हा निळा (Blue) होता. तर सहाव्या दिवसाचा रंग हा पिवळा (Yellow)होता. तर सातव्या रंग हा हिरवा होता. तर आठव्या दिवसाचा रंग हा जांभळा (Purple) होता. तर आजचा (२५ ऑक्टोबर) आणि शेवटचा रंग हा गुलाबी (Rose) आहे.  चला तर यानिमित्ताने आपणही आपल्या मित्र मंडळींना द्या विशेष शुभेच्छा. 

दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो.  यावेळी मोठ्या प्रमाणात दांडिया आणि गरबा खेळला जातो. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने हा उत्सव साधेपणा साजरा करण्यात यावा असं स्वत: मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे.

असं असलं तरीही आपण नवरात्रोत्सवाचा उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका. आपण कोरोना संसर्गामुळे एकत्र येऊ शकलो नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला नक्कीच देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (navratri 9 colors wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  

द्या नवरंगाच्या खास शुभेच्छा!

नवरात्रीच्या खूप शुभेच्छा... आजचा रंग - गुलाबी (Pink)

(फोटो सौजन्य: कुंजिका इंस्टाग्राम)

आजचा रंग - गुलाबी 
गुलाबी रंग म्हणजे प्रेमाचं प्रतिक
गुलाबी रंग म्हणजे प्रेमाची उधळण 
नवरात्रौत्सव आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: पूजा पुरंदरे इंस्टाग्राम)

आजचा रंग - गुलाबी 
गुलाबी रंग स्नेहाचा, प्रेमाचा, 
जिव्हाळ्याचा, आपुलकीचा 
आणि सौंदर्याचा...
नवरात्रौत्सव आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: सोनाली खरे इंस्टाग्राम)

आजचा रंग - गुलाबी 
गुलाबी रंग म्हणजे आशा 
आणि नवी सुरुवात 
नवरात्रौत्सव आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 


(फोटो सौजन्य: रेशम टिपणीस इंस्टाग्राम)

आजचा रंग - गुलाबी 
गुलाबी रंगाची उधळण 
रंगी रंगले हे जीवन 
झाली प्रेमाची गुंफण 
नवरात्रौत्सव आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी