Navratri 9 colors 2020: आजचा रंग (पांढरा)- द्या नवरंगाच्या शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsapp Quotes on Navratri 9 colors 2020: यंदा १७ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना नवरंगाच्या शुभेच्छा आणि पुढील मेसेज पाठवू शकतात. जाणून घ्या आजचा रंग कोणत

Navratri 9 colors 2020
आजचा रंग (पांढरा)- द्या नवरंगाच्या शुभेच्छा-Whatsapp मेसेज  |  फोटो सौजन्य: Instagram

Navratri 9 colors 2020 whatsApp Marathi wishes and Messages (Todays Colors White): यंदा १७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुढील काही आपल्याला नवनव्या रंगांची उधळण पाहायला मिळणार आहे. यावेळी दररोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करुन नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यामध्ये महिला वर्गाचा सहभाग जास्त असोत. यंदा नवरात्रोत्सवचा पहिला रंग हा करडा (Gray) आहे. तर दुसऱ्या दिवसाचा रंग हा केशरी (Orange) होता तर आजचा रगं म्हणजेच तिसऱ्या दिवसाचा रंग पांढरा (White) आहे.  चला तर यानिमित्ताने आपणही आपल्या मित्र मंडळींना द्या विशेष शुभेच्छा. 

दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो.  यावेळी मोठ्या प्रमाणात दांडिया आणि गरबा खेळला जातो. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने हा उत्सव साधेपणा साजरा करण्यात यावा असं स्वत: मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे.

असं असलं तरीही आपण नवरात्रोत्सवाचा उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका. आपण कोरोना संसर्गामुळे एकत्र येऊ शकलो नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला नक्कीच देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (navratri 9 colors wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  

द्या नवरंगाच्या खास शुभेच्छा!

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

आजचा रंग - पांढरा 

पांढरा रंग म्हणजे शुद्धता आणि शांती.. 

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)


आजचा रंग - पांढरा 

शुभ्र रंग हा असा 
धवल आणि शांत... 
गरज ज्याची भासे
जागी आजच्या नितांत 

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

आजचा रंग - पांढरा 

पांढरा रंग पावित्र्याचा, बुद्धीमत्तेचा 
द्योतक आहे...
नितळतेचं आणि निरागसतेचं प्रतिकही आहे.. 

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

आजचा रंग - पांढरा 

पांढरा रंग मन आणि चित्त यावर चांगला प्रभाव पाडतो.

तसेच विचार आणि कार्यामध्ये देखील पावित्र्य आणतो.. 

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

आजचा रंग - पांढरा 

स्वच्छतेचा रंग पांढरा,
पारदर्शकतेचा रंग पांढरा 
रंग पांढरा नितळ स्वच्छ मनाचा... 

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी