मुंबई: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वचजण तयार आहेत. संपूर्ण जगभरात नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात होत आहे. प्रत्येकाला वाटत असतं की येणारं नववर्ष हे आपल्या घरासाठी आणि कुटुंबासाटी आनंदाचं, सुख-समृद्धीचं जावो. यासाठी सर्वच नागरिक प्रयत्नशील देखील असतात. तुम्हाला सुद्धा २०२० हे वर्ष आनंदाचं जावो असं वाटत असेल तर तुम्हाला काही ठराविक उपाय करावे लागतील. जाणून घ्या काय आहे हे उपाय जे तुम्हाला नववर्षात लाभ देतील.