Happy Raksha Bandhan 2020: रक्षाबंधनानिमित्त मराठी शुभेच्छापत्रं, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Happy Raksha Bandhan 2020 messages: रक्षाबंधनानिमित्त भाऊ-बहिणींना शुभेच्छा देणारे मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहूयात सोशल मीडियात व्हायरल होणारे हे खास मेसेजेस...

Raksha Bandhan wishes
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस  |  फोटो सौजन्य: Getty Images

Happy Raksha Bandhan 2020 messages: भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा आणि त्यांच्या प्रेमाचा दिवस म्हणजेच राखी पौर्णिमा (Rakhi Purnima) अर्थात रक्षाबंधनाचा सण. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला देशभरात रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. केवळ हिंदू धर्मातच नाही तर इतर धर्मातही रक्षाबंधन या सणाला मोठे महत्व आहे. यावर्षी रक्षाबंधनाचा हा सण सोमवारी म्हणजेच ३ ऑगस्ट (3 August 2020) रोजी आहे.

यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळे हा सण साजरा करण्यात अडथळा येणार असं दिसत आहे. दूर अंतरावर राहत असलेले भाऊ-बहिण यंदा एकमेकांना भेटू शकणार नाहीयेत. मात्र, असे असले तरी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांना संपर्क साधता येणार आहे. कुरिअरच्या माध्यमातून राखी पाठवता येणार आहे. इतकेच नाही तर या खास प्रसंगी तुम्ही शुभेच्छाही देऊ शकता. सोशल मीडियात व्हायरल होणारे असेच काही शुभेच्छा देणारे मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या मेसेजेसच्या द्वारे तुम्ही आपल्या भाऊ, बहिणीला तसेच इतर नातेवाईकांनाही अनोख्या मार्गाने शुभेच्छा देऊ शकतात. 

पाहूयात सोशल मीडियात व्हायरल होणारे काही मेसेजेस

नाते बहीण - भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे...
जपून ठेवू या हे बंध रेशमाचे !
अतूट बंधन रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा !

(फोटो सौजन्य: iStock Images)

बहिणीच्या मायेचा 
भावाच्या प्रेमाचा 
सण जिव्हाळ्याचा 
रक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा 

"नात्यांचे गोड बंधन रेशमच्या धाग्यांनी अधिक समृद्ध करणारा सण रक्षाबंधन"
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: BCCL)

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन 
घेऊन आला हा श्रावण
आज आहे बहिण भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा

(फोटो सौजन्य: BCCL)

दृढ बंध हा राखीचा,
गौरव अतुट नात्याचा,
नाजुक अक्षय प्रेमाचा,
हा बंध रेशमी धाग्याचा..!
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा 

(फोटो सौजन्य: Getty Images)

रेशमाच्या बंधनाने नातं अधिक खुललं...
बहिणीचे प्रेम मनगटी सजलं...
रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा 

दिवस भाऊ बहिणीच्या अभिनव नात्याचा..
ना अट रक्ताच्या नात्याची, ना जाती-धर्माची, 
भावना फक्त एकमेकांच्या रक्षणाची, सुरक्षेची. 
आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!

बंध हे सुरक्षेचे 
बंधुत्वाच्या भावनांचे 
आयुष्यभर जपण्याचे..
रक्षाबंधन निमित्त शुभेच्छा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी