Tulsi Vivah 2020 whatsApp Marathi wishes and Messages: दिवाळी (Diwali) सणानंतर आता सर्वांना तुळशी विवाहाचे (Tulsi Vivah) वेध लागले आहेत. आज (२६ नोव्हेंबर) म्हणजेच भागवत एकादशीपासून तुळशी विवाहारंभ झाला आहे. आता पुढील पाच दिवस हा उत्सव सुरु राहणार आहे. म्हणजेच ३० नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेला याची सांगता होणार आहे. यावेळी तुळशीचं प्रतिकात्मक लग्न लावलं जातं. दरवर्षी मोठ्या जल्लोषात तुळशी विवाह सोहळा हा पार पडत असतो. यावेळी अनेक ठिकाणी सामूहिक तुळशी विवाहा पार पडतं. पण यंदा या सणावर देखील कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे यावेळी आपण एकत्र येणं टाळलं पाहिजे. मात्र असं असलं तरीही ऑनलाईनच्या युगात आपण तुळशी विवाह साजरा करु शकतो. तसेच एकमेकांना शुभेच्छा देखील देता येणार आहे.
दरवर्षी तुळशी विवाह सर्वत्र जल्लोष साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे तुळशी विवाह साजरं करताना अनेक बंधनं पाळावी लागणार आहेत. मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे अनिवार्य आहे. तसंच वायू प्रदूषण होऊ नये यासाठी फटाके देखील न फोडण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलेलं आहे. त्यामुळे यंदा तुळशी विवाह साधेपणाने साजरा करावा लागणार आहे.
कोरोनामुळे आपण तुळशी विवाहाचा उत्साह मात्र कमी होऊ देऊ नका. कोरोना संसर्गामुळे आपण एकत्र येऊ शकलो नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुळशी विवाहाच्या शुभेच्छा नातेवाईकांना आणि कुटुबीयांना देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Tulsi Vivah wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.
द्या तुळशी विवाहाच्या खास शुभेच्छा!
(फोटो सौजन्य: Twitter)
आनंदाचे , मांगल्याचे , पावन पर्व तुळशी विवाहाचे !!
तुळशी विवाह निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
(फोटो सौजन्य: Twitter)
भारतात हिंदू धर्मीयांच्या प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन नक्कीच दिसेल. तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. या पवित्र तुळशी विवाह उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा.
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
(फोटो सौजन्य: Twitter)
उत्सव मांगल्याचा, पावित्र्याचा...
पवित्र तुळशी विवाहाचा उत्सव... एक आनंददायी क्षण...
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
(फोटो सौजन्य: Twitter)
हिंदू धर्मात अतिशय पवित्र अशा मानणाऱ्या तुळशीच्या विवाह सोहळ्यास आजपासून सुरुवात... तुम्हा सर्वांना तुळशी विवाहाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
(फोटो सौजन्य: Twitter)
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही व्हा लग्न सोहळ्यात सामील
मोठया जल्लोषात साजरा करुया तुळशी विवाह
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
(फोटो सौजन्य: Twitter)
तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चन्द्रबलं तदेव ।
विद्याबलं दैवबलं तदेव
लक्ष्मीपते तेंऽघ्रियुगं स्मरामि ॥
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
(फोटो सौजन्य: Twitter)
तुळशी विवाह क्षण आनंदाचा, क्षण उत्साहाचा
शुभमंगल सावधान...
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!