Vinayak Chaturthi 2022: विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा, Facebook आणि Whatsapp मेसेज

Vinayak Chaturthi image 2022: विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा-अर्चा केली जाते. दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीप्रमाणेच भाविक विनायक चतुर्थीला देखील गणपती बाप्पाची आराधना करतात.

happy vinayak chaturthi 2022 whatsapp and facebook status wishes images quotes photos greeting message in marathi
Vinayak Chaturthi 2022: विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा, Facebook आणि Whatsapp मेसेज 

विनायक चतुर्थीच्या दिवशी (Vinayak Chaturthi)भाविक गणेशाची (Ganpati Bappa) आराधना केली जाते. उद्या (28 ऑक्टोबर 2022) विनायक चतुर्थी आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करणाऱ्या भाविकांच्या इच्छा गणराया पूर्ण करतात अशी अनेक गणेशभक्तांची श्रद्धा आहे. 

विनायक चतुर्थी निमित्त गणेशाची पूजा करताना अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणावे तसेच विनायक चतुर्थीच्या मंत्राचा (Ganesh Mantra) जप करावा. श्री गणेशाची पूजा (Puja) करण्यासाठी जास्वंदाची फुले आणि दुर्वा यांचा वापर करावा. तसेच दिवसभर उपवास करावा. 

यावेळी दूध, फलाहार असा हलका आहार घेणं सोयीस्कर असतं. यासोबतच राग, लोभ या दुर्गुणांचा त्याग करण्यासाठी संकल्प करावा आणि त्यावर अंमल देखील करण्यात यावा. 

विनायक चतुर्थी मंत्र

प्रातर्नमामि चतुराननवन्द्यमानमिच्छानुकूलमखिलं च वरं ददानम्।
तं तुन्दिलं द्विरसनाधिपयज्ञसूत्रं पुत्रं विलासचतुरं शिवयो: शिवाय।।
प्रातर्भजाम्यभयदं खलु भक्तशोकदावानलं गणविभुं वरकुञ्जरास्यम्।
अज्ञानकाननविनाशनहव्यवाहमुत्साहवर्धनमहं सुतमीश्वरस्य।।

चतुर्थीनिमित्त अनेक गणपती मंदिरात विशेष पूजा आयोजित केली जाते. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण  WhatsApp, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवरुन विनायक चतुर्थीच्या देखील शुभेच्छा, Messages आणि Wishes पाठवून विनायक चतुर्थीचा उत्साह आणखी वाढवू शकता. आम्ही आपल्यासाठी विनायक चतुर्थीनिमित्त असेच काही खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, ग्रिटींग्स, शुभेच्छापत्रं आणली आहेत, जे आपण आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना पाठवू शकता.

विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा! 

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती

विनायक चतुर्थीच्या मन:पूर्वक शुभेच्छा

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |
तीसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें

विनायक चतुर्थीच्या मन:पूर्वक शुभेच्छा

पाचवे श्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |
सातवे विघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें

विनायक चतुर्थीच्या मन:पूर्वक शुभेच्छा

नववे श्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |
अकरावे गणपति बारावे श्रीगजानन

विनायक चतुर्थीच्या मन:पूर्वक शुभेच्छा

विनायक चतुर्थीची कथा

विनायक चतुर्थीची एक गोष्ट प्रचंड लोकप्रिय आहे. एकदा भगवान शंकर आणि देवी पार्वती यांना एक खेळ खेळण्याची इच्छा झाली. या बैठ्या खेळात कोण जिंकले, कोण हरले याचा निर्णय देण्यासाठी भगवान शंकराने गवतापासून एक पुतळा तयार केला आणि त्यात प्राण फुंकले. 

खेळात तीन वेळा देवी पार्वतीचा विजय झाला पण पुतळारुपी बालकाने भगवान शंकराचा विजय झाल्याचे प्रत्येकवेळी सांगितले. या  प्रकाराने संतापलेल्या देवी पार्वतीने त्या  पुतळारुपी बालकाला तिथेच चिखलात पडून राहशील, असा शाप दिला. घाबरलेल्या पुतळारुपी बालकाने देवी पार्वतीची माफी मागितली. अखेर देवी पार्वतीने उःशाप दिला. एक वर्षानंतर नागकन्या या परिसरात येईल. जर तिच्या सल्ल्याने विनायक चतुर्थीचे व्रत केले तर तू शापातून मुक्त होशील असे देवी पार्वती म्हणाली. पुढे वर्षभराने देवी पार्वतीचे म्हणणे खरे ठरले. शापमुक्त बालक कैलास पर्वतावर आला. तिथे त्याने भगावन शंकर आणि देवी पार्वतीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. देवी पार्वतीने ही इच्छा पूर्ण करावी म्हणून भगवान शंकराने विनायक चतुर्थीचे व्रत केले. या व्रताने प्रसन्न होऊन देवी पार्वतीने बालकाला कैलास पर्वतावर राहण्यास परवानगी दिली. हे बालक म्हणजे गणपतीचा भाऊ कार्तिकेय.

जसा कार्तिकेयाला आणि पुढे शंकराला विनायक चतुर्थीच्या व्रताचा फायदा झाला तसाच लाभ इतरांनाही मनोभावे व्रत अंगिकारल्यास होऊ शकतो, असे सांगतात. त्यामुळेच विनायक चतुर्थीला गणपतीचा पूजा, उपवास, दानधर्म याला महत्त्व आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी