Hariyali Teej 2022 Date, Puja Timings:  उद्या आहे हरियाली तीज, जाणून घ्या पुजेचा मुहुर्त आणि महत्त्व

श्रावणात हरियाली तीज हा सण साजरा केला जातो. उत्तर भारतासह महाराष्ट्रातही हा सण साजरा केला जातो. विशेषतः महिलांसाठी हा सण खास असतो. हिंदू पंचांगानुसार श्रावणाच्या तृतीय तिथीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पुजा केली जाते. याच दिवशीच भगवान शंकर आणि माता पार्वतीचे मिलन झाले होते असे सांगितले जाते.

Hariyali Teej 2022
हरियाली तीज २०२२   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • श्रावणात हरियाली तीज हा सण साजरा केला जातो.
  • उत्तर भारतासह महाराष्ट्रातही हा सण साजरा केला जातो.
  • विशेषतः महिलांसाठी हा सण खास असतो.

Hariyali Teej 2022 Date, Time, Puja Muhurat: श्रावणात हरियाली तीज हा सण साजरा केला जातो. उत्तर भारतासह महाराष्ट्रातही हा सण साजरा केला जातो. विशेषतः महिलांसाठी हा सण खास असतो. हिंदू पंचांगानुसार श्रावणाच्या तृतीय तिथीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पुजा केली जाते. याच दिवशीच भगवान शंकर आणि माता पार्वतीचे मिलन झाले होते असे सांगितले जाते. प्रथेनुसार जर मुली या दिवशी मनापासून उपवास करतात तर त्यांना चांगला पती मिळातो. जर तुम्हीही हा उपवास करत असला तर जाणून घेऊया तीज हरियाली पुजेचे महत्त्व आणि मुहुर्त.

अधिक वाचा : Guru Vakri Gochar: गुरु ग्रहाची वक्री चाल, तुळ राशीला होणार त्रास तर तीन राशींना होणार फायदा

हरियाली तीज २०२२ तारीख (Hariyali Teej 2022 Date)

हिंदू पंचागानुसार हरियाली तीज दर वर्षी श्रावणात शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला साजरा केला जातो. या वर्षी ३१ जुलै रोजी हा सण साजरा केला जात आहे, या दिवशी महिला उपवास धरतात. 

अधिक वाचा : Money Plant vastu tips: घरात आहे मनी प्लांट मग आजच बांधा लाल धागा, होईल भरभराट

हरियाली तीज पूजा मुहूर्त (Hariyali Teej Puja Muhurta)

  1. हरियाली तीज यंदा रविवारी ३१ जुलै रोजी साजरी होणार आहे. हरियाली तीजचा मुहुर्त रविवारी दुपारी २.२० सुरू होणार आहे तर १ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजून ४२ पर्यंत असणार आहे. रविवारी हरियाली तीज पुजा केल्यास पुण्य लाभतं. 
  2. शुभ समय आणि अभिजित मुहूर्त- दुपारी १२ वाजल्यापासून ते १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत.
  3. राहुकाल संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटापासून ते सांयकाळी ७ वजऊन १३ मिनिटांपर्यंत

राहु काळात शुभ कार्य करण्यास मनाई असते. 

अधिक वाचा : Nag Panchami 2022: नागपंचमीच्या दिवशी या पद्धतीने करा नागांची पूजा, जाणून घ्या पूजेची योग्य विधी
 

हरियाली तीज २०२२ चे महत्व (Hariyali Teej 2022 Significance)

हरियाली तीजचे व्रत विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ठेवतात. अविवाहित मुलींनी हे व्रत केल्यास त्यांना मनासारखा पती मिळतो. हे व्रत केल्यामुळे विवाहित महिलांना संतती प्राप्त होते, तसेच हा उपवास केल्यामुळे विवाहित दाम्पत्याच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. 

अधिक वाचा : Budh Gochar: ऑगस्ट महिना या 5 राशींना करेल धनवान, 21 दिवस होईल धनाचा वर्षाव!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी