Hartalika 2022 Aarti Marathi:पूजा केल्यावर करा पार्वतीची आरती, श्रद्धेनं म्हणा 'ही' श्री हरितालिकेची आरती मराठीतून

Hartalika Aarti Marathi: विवाहित महिला आणि तरूणीसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं आहे. या दिवशी महिला आणि तरूणी निर्जळ उपवास (Fast without water) करतात.

Hartalika Aarti Marathi
हरितालिका व्रत आरती मराठीत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हरितालिका (Haritalika) हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो.
  • या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्याच्या इच्छेने व्रत ठेवून माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करतात.
  • विवाहित महिला आणि तरूणीसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं आहे. या दिवशी महिला आणि तरूणी निर्जळ उपवास (Fast without water) करतात.

मुंबई: Hartalika 2022 Parvati Aarti In Marathi: हरितालिका (Haritalika) हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यंदा हे व्रत 30 ऑगस्ट रोजीला आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्याच्या इच्छेने व्रत ठेवून माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करतात.  हरितालिका व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हरितालिकेच्या निमित्ताने प्रत्येक स्त्रीचा उद्देश देवी पार्वती (Goddess Parvati) आणि भगवान शिव (Lord Shiva) यांना तिच्या व्रत आणि उपासनेने प्रसन्न करणे हा असतो. विवाहित महिला आणि तरूणीसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं आहे. या दिवशी महिला आणि तरूणी निर्जळ उपवास (Fast without water)  करतात.  (Hartalika 2022 shiv Parvati Aarti in Marathi) 

हरितालिकेच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूर्ण भक्तिभावाने पूजा करतात. हे व्रत देखील निर्जळ असते. 

अधिक वाचा- मुंबईकरांनो, आता नो टेन्शन..! पाण्याची चिंता मिटली; सातही धरणात 97% साठा

तुम्हीही हे व्रत पाळत असाल तर पूजा केल्यानंतर ही आरती अवश्य म्हणा. 

श्री हरितालिकेची आरती (Hartalika Aarti Marathi)

जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीते । ज्ञानदीपकळिके॥धृ०॥

हरिअर्धांगी वससी। जासी यज्ञा माहेरासी। तेथे अपमान पावसी यज्ञकुंडी गुप्त होसी॥ जय०॥१॥

रिघसी हिमाद्रीच्या पोटी। कन्या होसी तू गोमटी। उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी॥जय० २॥

तापपंचाग्निसाधने। धूम्रपाने अधोवदने। केली बहु उपोषणे।। शंभु भ्रताराकारणे॥जय० ॥३॥

लीला दाखविसी दृष्टी। हे व्रत करिसी लोकांसाठी। पुन्हा वरिसी धूर्जटी। मज रक्षावे संकटी।। जय० ॥४॥

काय वर्ण तव गुण। अल्पमति नारायण। माते दाखवी चरण। चुकवावे जन्म मरण। जय देवी०॥५॥

हरितालिका पूजा विधि

हरितालिकेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून आपल्या दैनंदिन कामातून निवृत्त होऊन  स्वच्छ वस्त्र परिधान करावे. आता भगवान शिव आणि माता पार्वतीचे स्मरण करून व्रत करा. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मूर्ती काळ्या मातीने किंवा वाळूने बनवाव्यात. आता केळीची पाने लाकडी चौरंगावर चारही कोपऱ्यात बांधा. आता शिव आणि माता पार्वतीच्या तसेच इतर देवांच्या मूर्ती चौरंगावर स्थापित करा. नियमानुसार भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा.

पार्वतीची पूजा केल्यानंतर सोळा श्रृंगार अर्पण करून शिवशंकराला वस्त्र अर्पण करावे. आता भगवान शिव आणि माता पार्वतीला भोग अर्पण करा. भोग अर्पण केल्यानंतर देवाच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा. आता हरितालिकेची कथा पूर्ण भक्तिभावाने वाचा. कथा वाचून देवी पार्वती आणि शिव यांची पूजा करून श्रद्धेने आरती करावी. आरती केल्यानंतर देवाकडे पूजेतील चूक आणि चुकांची क्षमा मागावी.

या दिवशी रात्रभर जागरण करावे. व्रताच्या दुस-या दिवशी स्नान करून देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करावी. पूजा केल्यानंतरच उपवास सोडावा.

हरितालिका व्रत पूजा मंत्र

नमस्त्यै शिवायै शर्वाण्यै सौभाग्यं संतति शुभा।
प्रयच्छ भक्तियुक्तानां नारीणां हरवल्लभे।

मनचाहे वर पाने के लिए करें ये मंत्र

हे गौरी शंकर अर्धांगिनी यथा त्वं शंकर प्रिया।
तथा माम कुरु कल्याणी कांतकांता सुदुर्लाभाम्।।


(अस्वीकरण: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामान्य समजुती आणि सामग्रीवर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी