Hartalika Teej Vrat Puja Niyam Puja Samagri: महिला (woman) आज 30 ऑगस्ट रोजी हरितालिकाचं व्रत (Hartalika Teej Vrat ) पाळत आहेत. हरितालिका तृतीया हा सण देवी पार्वती (Goddess Parvati) आणि भगवान भोलेनाथ (Lord Bholenath) यांच्या पुनर्मिलनाचे प्रतीक आहे. माता पार्वतीने महादेव (Lord Shiva) भेटावेत म्हणून अन्न आणि जलाचा त्याग करून हरितालिका तृतीयाचा उपवास केला होता. (Ladies! If you are fasting on Hartalika Teej, know these important rules)
देवीच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भोलेनाथांनी तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला हरितालिका तीजचे व्रत करतात. ज्या विवाहित स्त्रिया आणि अविवाहित मुली हरितालिका तीज निर्जला व्रत ठेवतात, त्यांना रात्रभर जागरण करावे लागते. आज माता पार्वती आणि भोलेनाथ यांची विधिवत पूजा केल्याने महिलांना सुखी वैवाहिक जीवन आणि अविवाहित मुलींना योग्य वराची प्राप्ती होते. नियमानुसार हरितालिका तीजचा उपवास एकदा सुरू झाला की तो मध्येच सोडता येत नाही. अजून असे काही नियम आहेत जे महिलांनी पाळावेत. जर हे निय पाळले नाहीत तर आपल्याला आपण केलेल्या पूजेचं फळ मिळत नाही. तसेच काही चुका करणे टाळा, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.
Read Also : 30 ऑगस्ट 2022 चे राशीभविष्य, कसं असेल मंगळवारचं भविष्य
हिंदू धर्मग्रंथानुसार, माता पार्वतीने भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. इच्छित पती आणि सुखी वैवाहिक जीवन मिळण्यासाठी हरितालिका तृतीयाचे व्रत केले जाते. या दिवशी शिव-पार्वतीची पूजा केली जाते. हरितालिका तीजचे फळ मिळावे म्हणून महिलांना निर्जला व्रत करावे लागते म्हणजेच या उपवासात काहीही खाणे किंवा पिणे निषिद्ध आहे.
हरितालिका तीजची पूजा करताना संपूर्ण पूजा साहित्य वापरण्याची खात्री करावी. महादेवाला आवडणारे धोतऱ्याची फुले, बेलची पाने, अत्तर अर्पण करावे. त्याचबरोबर माता पार्वतीला श्रृंगार अर्पण करा. अन्यथा पूजा अपूर्ण राहील. हरतालिका तीज पाळणाऱ्या महिला व मुलींनी हिरवे कपडे परिधान करावेत. हातावर मेंहदी काढावी, मेकअप करावा, असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. लाल रंगाचे कपडे घालणे देखील चांगले आहे. हा देखील भाग्याचा रंग आहे, परंतु या दिवशी महिलांनी काळा किंवा पांढरा रंगाचे कपडे अजिबात परिधान करू नये.
Read Also : गणेश चतुर्थीनिमित्त Social media वर मराठीतून द्या शुभेच्छा
हरितालिका तीजची पूजा केल्यानंतर व्रताची कथा अवश्य ऐका. महिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, पूर्ण पूजेशिवाय या व्रताचे फळ मिळणार नाही. हरितालिका तीजचा उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी कोणाबद्दल वाईट बोलू नये किंवा त्यांच्या मनात वाईट विचार आणू नयेत. या दिवशी अजिबात रागावू नका. तुमचा जास्तीत जास्त वेळ देवाच्या भक्तीसाठी द्या. तसेच उपवासाच्या दिवशी झोपू नये. पती-पत्नीने आपापसात वाद घालू नयेत, हे नियम पाळल्यास महिलांना हरतालिकेच्या व्रताचे फळ निश्चित मिळेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याची पुष्टी करत नाही.)