Hartalika Teej 2022 :  या तारखेला आहे हरितालिकेचे व्रत, जाणून घ्या नियम आणि विधी

हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतिलाकेचे व्रत ठेवले जाते. या वर्षी हरितालिका मंगळवार ३० ऑगस्ट २०२२ रोजी असणार आहे. हरितालिकेचे व्रत सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. तसेच चांगला पती मिळावा म्हणून कुमारिका हे व्रत करतात.

hartalika teej
हरितालिका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतिलाकेचे व्रत ठेवले जाते.
  • वर्षी हरितालिका मंगळवार ३० ऑगस्ट २०२२ रोजी असणार आहे.
  • हरितालिकेचे व्रत सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात.

Hartalika Teej Vrat Rules: हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतिलाकेचे व्रत ठेवले जाते. या वर्षी हरितालिका मंगळवार ३० ऑगस्ट २०२२ रोजी असणार आहे. हरितालिकेचे व्रत सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. तसेच चांगला पती मिळावा म्हणून कुमारिका हे व्रत करतात. हरितालिकेच्या दिवशी महिला १६ शृंगार करतात तसेच भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करतात. (Hartalika Teej know date and rules hindu panchang)

अधिक वाचा : Shukra Gochar 2022: 31 ऑगस्टपर्यंत या राशीच्या व्यक्ती धनवान होऊ शकतात, शुक्रदेवाची असेल असीम कृपा

हरितालिका व्रत हे करवा चौथ, हरियाली तीज, कजरी तीज तसेच वट सावित्री व्रतपैकी सर्वात कठीण व्रत मानले जाते. महिला या दिवशी निर्जळी उपवास करतात. म्हणजेच २४ तासांसाठी पाणीही प्यायचे नाही. या व्रत दरम्यान अनेक नियम पाळावे लागतात तेव्हाच हे व्रत सुफळ संपूर्ण होते. जाणून घेऊया हरितालिका उपवासाचे नियम.

अधिक वाचा : Vastu Tips for home: रात्री झोपताना बेडरूममध्ये पती-पत्नीने करू नये 'या' चुका, अन्यथा...

हरितालिकेच्या उपवासाला या नियमांचे पालन करा

  1. हरितालिकेच्या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीसाठी उपवास करतात. या दिवशी महिलांनी आपल्या पतीशी खोटं बोलू नये तसेच पती दुःखी होईल असे काही करू नये.
  2. हरितालिकेच्या दिवशी झोपण्यास मनाई आहे. संपूर्ण दिवस जागून काढणे अपेक्षित आहे. अगदी रात्रीही महिलांनी झोपण्याऐवजी जागरण करणे अपेक्षित आहे. जर या दिवशी महिला झोपल्या तर त्या पुढील जन्मी अजगराच्या रुपात जन्माला येतात अशी मान्यता आहे.
  3. हरितालिकेच्या दिवशी महिलांनी घरात भांडणे करू करू, घरातील ज्येष्ठांचा आदर रखावा. असे केल्यास व्रत सुफळ होत नाही. 

अधिक वाचा : समुद्र शास्त्र: अशा बोटांच्या मुली असतात खूप लकी, चमकवतात पतीचे भविष्य

हरितालिकेच्या दिवही पाणी पिणे योग्य आहे का ?

हरतालिकेचे व्रत निर्जळी असते. या दिवशी अन्न तसेच पाणीही प्यायचे नसते. या दिवशी महिलांनी चुकूनही पाणी प्यायचे नसते. हरितालिकेच्या दिवशी महिलेने चुकून पाणी प्यायले किंवा अन्न ग्रहण केले तर दुसर्‍या जन्मी महिला माकड होते. तसेच या दिवशी कुठली महिला दूध पिते तर दुसर्‍र्‍या जन्मी ती साप म्हणून जन्माला येते.

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाईम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी