Name Plate: तुमच्या घराबाहेर नेमप्लेट आहे का? तर नक्की वाचा हे

धर्म-कर्म-भविष्य
Updated May 24, 2022 | 17:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

vastu rules for name plate: वास्तुनुसार घराच्या बाहेर लावलेल्या नेमप्लेटचेही विशेष महत्त्व असते. हे लावण्याआधी वास्तुशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. याचे पालन केल्यास घरात सकारात्मकता येते. 

name plate
Name Plate: तुमच्या घराबाहेर नेमप्लेट आहे का? तर नक्की वाचा  
थोडं पण कामाचं
  • नेमप्लेटवर नाव दोन लाईनमध्ये लिहिले पाहिजे. याला एंट्री गेटच्या उजव्या बाजूला लावावे. 
  • वास्तुशास्त्रात सांगितले की नेमप्लेटचारंग घराच्या प्रमुखाच्या राशीच्या आधारावर असला पाहिजे. 
  • नेमप्लेट ही तुटकीफुटकी नसावी. सोबतच यात कोणतेही छेद नसावा. 

मुंबई: वास्तुशास्त्रात(vastushastra) प्रत्येक गोष्टीच्या सकारात्मक परिणामसाठी काही नियम सांगितले आहेत. जर या नियमांचे पालन केले गेले नाही तर त्याचे विपरित परिणाम समोर येतात. अशातच घराच्या बाहेर लावल्या जाणाऱ्या नेमप्लेटबाबतही(name plate) वास्तुशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. यामुळे केवळ घराची ओळखच होत नाही तर पॉझिटिव्ह एनर्जीही आपल्याकडे आकर्षित करते. Here is the vastu tips for Name Plate

अनेकजण आपल्याप्रमाणेच आपल्या घराचे नावही ठेवतात. घराचे नामकरण करतात आणि त्याच्या नावाची प्लेट लावतात. सोबतच घराच्या मुख्य व्यक्तीचे नावही त्याच्यावर लिहिले जाते. घराच्या बाहेर लावली जाणारी नेमप्लेट लावण्याबाबतही काही नियम आहेत. त्याबद्दलच्या काही गोष्टी ध्यानात घेतल्या तर यश, कीर्ती आणि सुख-समृद्धीचे आगमन होते. 

अधिक वाचा - तुम्हाला मिळू शकतो 200 रुपयांनी स्वस्त एलपीजी गॅस सिलिंडर

नेमप्लेटबाबत या गोष्टींचे ठेवा ध्यान

वास्तु जाणकारांच्या मते नेम प्लेट नेहमी स्वच्छ आणि योग्य आकाराची असावी. वास्तुनुसार नेमप्लेटचा आकार हा आयताकार असला पाहिजे. 

नेमप्लेटवर नाव दोन लाईनमध्ये लिहिले पाहिजे. याला एंट्री गेटच्या उजव्या बाजूला लावावे. 

नेमप्लेटवर लिहिल्या जाणाऱ्या अक्षरांची बनावट ही स्वच्छ असली पाहिजे. 

नेमप्लेटवर नाव अशा पद्धतीने लिहावे जे खूप भरलेले नसेल. 

नेमप्लेट नेहमी भित आणि दरवाजादरम्यान लावली पाहिजे. 

नेमप्लेट ही तुटकीफुटकी नसावी. सोबतच यात कोणतेही छेद नसावा. 

वास्तुनुसार नेम प्लेटवर माती अथवा कोळ्याचे जाळे नको. ती नेहमी स्वच्छ असावी. 

वास्तुशास्त्रात सांगितले की नेमप्लेटचारंग घराच्या प्रमुखाच्या राशीच्या आधारावर असला पाहिजे. 

आपल्या पसतीनुसार नेमप्लेटवर एकीकडे गणपतीचे अथवा स्वस्तिकचे चिन्ह बनवून घ्यावे. 

अधिक वाचा - डायबिटीज ग्रस्त लोकांनी जरूर खावी ही भाजी

नेमप्लेट थोडीशी जरी तुटली अथवा पॉलिश उतरले तर ती लगेचच बदला. नाहीतर घरात नकारात्मकता येते. 

यावर उजेडासाठी तुम्ही छोटासा बल्बही लावू शकता. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास घरात लक्ष्मीचा वास राहतो. सोबतच घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मकता येते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी