Holi 2023 story in Marathi : आज साजरा केल्या जाणाऱ्या होळीच्या सणांचं महत्त्व आणि कथा जाणून घ्या

Holi 2023 story in marathi : आपण साजर्‍या करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीच्या सणालाही विशेष महत्त्व आहे. पहिल्या दिवशी होलिका दहन (holikca dahan) होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळीला (holi) शिमगाही म्हटले जाते. भगवान शंकराची लीला, याला शिव-शिमगासुद्धा म्हटले जाते.  

Learn the significance and story of Holi festivals celebrated today
आज साजरा केल्या जाणाऱ्या होळीच्या सणांचं महत्त्व जाणून घ्या  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पवित्र अग्नी प्रज्वलित केल्याने वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक उर्जा संचारते.
  • पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते.
  • होळीला शिमगाही म्हटले जाते. भगवान शंकराची लीला, याला शिव-शिमगासुद्धा म्हटले जाते.

Holi 2023 Story in Marathi: मुंबई :  देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा, पद्धत वेगळी. पण तितकीच खास आणि आकर्षक आहे. आपण साजर्‍या करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीच्या सणालाही विशेष महत्त्व आहे. पहिल्या दिवशी होलिका दहन (holikca dahan) होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळीला (holi) शिमगाही म्हटले जाते. भगवान शंकराची लीला, याला शिव-शिमगासुद्धा म्हटले जाते.  

अधिक वाचा  : लग्नानंतर तुमचे हे बदलले का? मग हे असेल कारण

होळीचे महत्त्व 

होळी दहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बर्‍याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसर्‍या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.

अधिक वाचा  : डिजिटल मार्केटिंगमध्ये असं बनवा आपलं करिअर

होळीच्या दुसर्‍याच दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. या आनंदातच वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. तर दुसर्‍या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. 

होळी सणाचे वैज्ञानिक महत्व (Holi 2023 Importance)

धुलिवंदनच्या एका दिवसाआधी होलिका दहन केले जाते हे आपल्याला माहीत आहे. पवित्र अग्नी प्रज्वलित केल्याने वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक उर्जा संचारते असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. यासोबतच अनेक जंतू नष्ट होतात आणि होलिका दहनाच्या अग्नीतून नवीन ऊर्जेचा प्रभाव वातावरणात पसरतो, जो शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो.

अधिक वाचा  : श्री रामाच्या नावावर ठेवा आपल्या मुलाचं नाव

काय आहे  होळीची कहाणी 
 

हिंदू धर्मातील महत्वाचा सण म्हणून होळी सणाला ओळखतात. सत्याचा असत्याचा विजय, वाईटावर चांगलेपणा विजय हे या सणाचे प्रतीक आहे. होळी हा 2 ते 3 दिवसांचा सण आहे. होळीच्या सणादिवशी सगळे लोक वादविवाद, द्वेष, राग विसरून होलिका दहनासाठी एकत्र येतात. होळी साठी लागणारी लाकडं, गावातील सर्व लोक मिळून जमा करतात. व सर्व स्त्रिया एकत्र येऊन नैवैद्य, पूजेची सर्व तयारी करतात. यावरून कळते ही होळी हा सण एक सण नसून समाजाला एकत्र करणारा एक महत्त्वाचा सण आहे.   या सणाची एक पौराणिक कथा देखील आहे.

अधिक वाचा  : HOLI 2023 : प्रियजनांना मराठीतून द्या होळीच्या शुभेच्छा

पौराणिक कथा

हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता.  हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. पण प्रह्लादची विष्णू देवाविषयीची श्रद्धा वाढू लागली.  ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. 

अधिक वाचा  : HOLI 2023 : प्रियजनांना मराठीतून द्या होळी दहनाच्या शुभेच्छा

राजाने होलिकेला भक्त प्रह्लादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की, तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल.

भक्त प्रह्लादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला.
 
 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी