Maa Lakshmi: घराबाहेर या वस्तूंचे दर्शन असतं शुभ, लक्ष्मी मातेची होते कृपा

कधी कुणाचे नशीब बदलेल काही सांगता येत नाही. लक्ष्मी मातेची कृपा झाल्यास आपलं नशीब फळफळतं. धर्मशास्त्रानुसार काही वस्तू दिसणे शुभ असतं. या वस्तू दिसल्यास आपला दिवस चांगला जातोच तसेच लक्ष्मी मातेचीही कृपा होते.

lakshmi mata
लक्ष्मी मातेची कृपा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कधी कुणाचे नशीब बदलेल काही सांगता येत नाही.
  • लक्ष्मी मातेची कृपा झाल्यास आपलं नशीब फळफळतं.
  • धर्मशास्त्रानुसार काही वस्तू दिसणे शुभ असतं.

Maa Lakshmi:  मुंबई : कधी कुणाचे नशीब बदलेल काही सांगता येत नाही. लक्ष्मी मातेची कृपा झाल्यास आपलं नशीब फळफळतं. धर्मशास्त्रानुसार काही वस्तू दिसणे शुभ असतं. या वस्तू दिसल्यास आपला दिवस चांगला जातोच तसेच लक्ष्मी मातेचीही कृपा होते. 

नारळ दिसणे शुभ संकेत

सकाळी सकाळी नारळ दिसणे हे शुभ मानले जाते. सकाळी सकाळी नारळ दिसणे म्हणजे लक्ष्मी माता तुम्हाला संकेत देत आहे. लवकरच तुमचे दिवस बदलणार आहेत. सकाळी सकाळी जर तुम्हाला वानराचे दर्शन झाले तर तुमची गरीबी दूर होणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार तुमच्या घरासमोर कुठले रोप आपोआप वाढत असेल तर ते शुभ संकेत आहे. याचा अर्थ हळूहळू तुमच्या घरात संपत्ती येणार आहे. आणि तुमची कंगाली संपणार आहे.

घोड्याची नाळ दिसणे म्हणजे धनप्राप्ती होणार

वास्तूशास्त्रानुसार रस्त्यात जाताना तुम्हाला घोड्याची नाळ दिसली तर लक्ष्मी मातेचा संकेत मानला जातो. लवकरच तुमच्या घरात चांगली बातमी येणार आहे असे संकेत लक्ष्मी माता देत अहे. अशी नाळ दिसल्यास तुम्ही ती घरू घेऊन जाऊ शकतात. परंतु शनिवारच्या दिवशी अशी नाळ घरी घेऊन जाऊ नका.

जर तुमच्या नजरेत रंगी बेरंगी फुलपाखरं दिसली असतील तर लवकरच तुमच्या आयुष्यातील ताण दूर होणार आहे. गृह क्लेश दूर होणार आहे. तुमचे दिवस बदलणार आहे आणि तुमच्या घरी लक्ष्मीचे आगमन होणार आहे.

हे संकेत म्हणजे काम पूर्ण होणार

जर तुम्ही कामानिमित्त घराबाहेर पडला असाल आणि कुठल्याही व्यक्तीच्या हातात पाणी भरलेला कलश दिसला असेल तर तो शुभ संकेत आहे. याचा अर्थ ज्या कामासाठी तुम्ही घराबाहेर पडला आहात ते काम पूर्ण आणि यशस्वी होणार आहे. तसेच घराबाहेर पडल्यानंतर चारा खाणारी गाय दिसली तर ते ही शुभ संकेत मानले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी