Diwali 2021: दिवाळीची साफ-सफाई करताना या पाच गोष्टी सापडल्या तर आहेत शुभ संकेत, लाभणार लक्ष्मी मातेचा आशीर्वाद

हिंदु धर्मातच (Hinduism) नाही तर इतर धर्मातही (Religion) दिवाळी हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो.

If these five things are found while cleaning in Diwali
दिवाळीची साफ-सफाई करताना या पाच गोष्टी सापडल्या तर आहेत शुभ संकेत  |  फोटो सौजन्य: Indiatimes

नवी दिल्ली : हिंदु धर्मातच (Hinduism) नाही तर इतर धर्मातही (Religion) दिवाळी हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. दिवाळी (Diwali) ही प्रत्येक वर्षी कार्तिक (Kartik Mas) मासच्या कृष्ण पक्षच्या अमावस्य़ा तिथीला साजरा केला जातो. यावर्षी दिवाळी ४ नोव्हेंबर २०२१ गुरुवारी साजरी केली जाणार आहे. दरम्यान दिवाळीची चाहूल लागताच प्रत्येक घरात साफ-सफाई केली जाते. असं म्हटलं जातं की, लक्ष्मी मातेला (Lakshmi Mata) स्वच्छता खुप आवडत असते.

ज्या घरात स्वच्छता असते लक्ष्मी माता तेथे निवास करत असते. यामुळे दिवाळीच्या अनेक दिवस आधीपासून लोक आपापल्या घरांची साफसफाई करण्यास सुरुवात करतात. घराची साफसफाई करताना अचानक या 5 गोष्टी आढळून आल्या. आणि ज्या तुम्ही विसरला असाल तर समजून घ्या तुमच्यावर माता लक्ष्मीच्या कृपेचा वर्षाव होणार आहे.

दिवाळीत मिळालेल्या या 5 गोष्टी शुभ आहेत

  • साफसफाईच्या वेळी, जर तुमच्या पर्समध्ये किंवा कोणत्याही कपड्याच्या खिशात पैसे सापडले तर ते खूप शुभ मानले जाते.
  • पैसे कोणत्याही धार्मिक कार्यात टाकल्याने आई लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि घरात नेहमी आशीर्वाद असतो.
  • घर किंवा पूजास्थळाच्या साफसफाईच्या वेळी बासुरी किंवा मोर पंख मिळणे खूप शुभ असते. या गोष्टी भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्री कृष्णाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. या गोष्टी सापडल्याने घरावर लक्ष्मी मातेची कृपा राहत असते. 
  • जर घराच्या स्वच्छतेदरम्यान शंख किंवा शिंपले सापडले तर ते गंगेच्या पाण्याने धुवून संपत्तीच्या ठिकाणी ठेवावे. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.
  • स्वयंपाकघर साफ करताना, जर तुम्हाला पिशवीत ठेवलेला तांदूळ सापडला मग ते तुमच्यासाठी खूप भाग्यवान असल्याचे समजले जाते.
  • घराची साफसफाई करताना कुठेही लाल कपडा दिसला तर तो जपून ठेवावा. हा लाल कपडा तुमचा उद्याचा दिवस चांगला असणार याचे संकेत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी