Kundli predictions : कुंडलीत हा योग असल्यास या मुलींना मिळतो मनपसंत नवरा

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jan 27, 2022 | 14:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Astrology predictions: ज्योतिषशास्त्रानुसार ज्या मुलींच्या कुंडलीत बृहस्पती, शुक्र आणि बुध मजबूत असतात त्यांना मनाजोगता वर म्हणजे  नवरा भेटतो. विवाहाच्या दृष्टीने या ग्रहांचे विशेष महत्त्व असते. 

marriage
कुंडलीत हा योग असल्यास या मुलींना मिळतो मनपसंत नवरा 
थोडं पण कामाचं
  • ग्रहांचा व्यक्तीच्या जीवनावर विशेष प्रभाव पडतो
  • ज्या मुलींच्या कुंडलीत लग्न, पंचम, सप्तम आणि एकादश शुभ भावात असतात त्या मुलींना योग्य वर भेटतो
  • बृहस्पतीला ग्रहांचा गुरू म्हणजे पुरोहित म्हटले जाते, हा ग्रह अत्यंत ज्ञानी आणि गंभीर मानला जातो

Astrology Kundli predictions : ज्योतिषशास्त्रानुसार(horoscope) ग्रहांची चाल ही व्यक्तीचा दशा आणि दिशा निर्धारित करते. ग्रहांचा व्यक्तीच्या जीवनावर विशेष प्रभाव पडतो. पृथ्वीवर जन्म घेताच जातकावर नऊ ग्रहांचा(planet) परिणाम सुरू होतो आणि नेहमी त्याच्यावर राहतो. जीवनात आनंदाचे प्रसंगही तेव्हाच येतात जेव्हा कुंडलीतील(planet in kundli) ग्रह अनुकूल असतात. जर कुंडलीतील ग्रहांची दशा आणि दिशा चांगली असेल तर आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. ज्योतिषविज्ञानानुसार मुलींच्या कुंडलीत जेव्हा शुभ ग्रहांची संख्या अधिक असते तेव्हा ते अत्यंत फलंदायी मानले जाते. If this is yog in kundali then this girls' got good husband

असं म्हटलं जातं की ज्या मुलींच्या कुंडलीत लग्न, पंचम, सप्तम आणि एकादश शुभ भावात दृष्ट असतात त्या मुलींना मनासारखा तसेच तिच्यासाठी योग्य असलेला जोडीदार भेटतो. विवाहाच्या दृष्टीने या ग्रहांना विशेष महत्त्व आहे. या प्रकारे जेव्हा मुलींच्या कुंडलीत तीनही ग्रह मजबूत असतात त्यांना योग्य जोडीदार भेटतो. 

अधिक वाचा - कासवांवर बसवले सॅटलाईट ट्रान्समीटर

बृहस्पती ग्रह

बृहस्पती ग्रह म्हणजेच सर्व ग्रहांचा गुरू मानला जातो. हा ग्रह अत्यंत ज्ञानी आणि गंभीर मानला जातो. सोबतच व्यक्तीचे वय, ज्ञान आणि धर्मावर प्रभाव टाकतो. हा ग्रह एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मजबूत असल्यास त्या व्यक्तीला समाजात मानसन्मान प्राप्त होतो. सोबतच मुलींच्या कुंडलीमध्ये हा ग्रह अत्यंत मजबूत असेल तसेच शुभ योगात विराजमान असेल तर योग्य वरप्राप्ती होते. मात्र हा ग्रह कमकुवत असल्यास त्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात. अथवा त्यांचे वैवाहिक जीवन खराब होऊ शकते. 

शुक्र ग्रह

सौरमंडळातील नऊ ग्रहांमध्ये शुक्राचे महत्त्व अधिक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला लक्झरी लाईफचा कारक मानले जाते. सोबतच वैभव, विलास, सुख, प्रेम आणि धनसंपत्तीचा कारक असतो. याला सुंदरतेचेही प्रतीक मानले जाते. ज्या व्यक्तीचा शुक्र मजबूत असतो त्याच्या जीवनात नेहमी सकारात्मकता येते. लग्न विवाहहाच्या दृष्टीने शुक्राला विशेष मानले जाते. ज्योतिषविद्येनुसार ज्या मुलींच्या कुंडलीतील शुक्र मजबूत असतो त्यांना योग्य वराची प्राप्ती होते. 

अधिक वाचा - ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचं निधन

बुध ग्रह

ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. या ग्रहाला युवराज म्हटले जाते. हा ग्रह कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी असतो. सोबतच बुध बुद्धी, एकाग्रता, वाणी, त्वचा आणि सौंदर्याचा कारक असतो. जातकाच्या कुंडलीत बुध मजबूत असल्यास बुद्धी प्रखर होते. बुधाशिवाय बुद्धी असणे अशक्य असते. असे म्हटले जाते की मुलींच्या कुंडलीतील सप्तम भावात जेव्हा बुधाची दृष्टी पडते तेव्हा तिला योग्य वराची प्राप्ती होते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी