Chanakya Niti: करोडपती असताना ही चुकी कराल तर व्हाल गरीब, जाणून घ्या कारण नाहीतर होईल पश्चाताप

चाणक्य नीतिमध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचा अवलंब केल्यास माणूस अनेक संकटांपासून दूर राहू शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो. दरम्यान आपल्या चाणक्य नीतिमध्ये आचार्यांनी नातेसंबंधासह आर्थिकबाबतही मार्गदर्शन केले आहे. माणसाकडे पैसे कसे टिकतील याची माहितीही चाणक्य देतात. चाणक्य म्हणतात की, लक्ष्मी माता कोणाकडेच राहत नाही.

Chanakya Niti
करोडपती असताना ही चुकी कराल तर व्हाल गरीब  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • फसवणूक करून किंवा एखाद्याला दुखवून कमावलेला पैसा जीवनात अनेक समस्या घेऊन येतो.
  • विद्वान व्यक्तीला गरीब समजून त्याचा अपमान करण्याची चूक करू नका.
  • या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणजे कोणालाही गरीब समजू नये.

Chanakya Niti : महान विद्वान आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी जीवन (life)  यशस्वी आणि आनंददायी करण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्याची नीति आजही प्रासंगिक आहेत आणि लोकांना मार्गदर्शन करणारी आहेत. मुत्सद्देगिरी, राजकारण, अर्थशास्त्र (Economics) यामध्ये तरबेज असलेले आचार्य चाणक्य हे व्यावहारिक ज्ञानाचेही उत्तम जाणकार आहेत. चाणक्य नीतिमध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचा अवलंब केल्यास माणूस अनेक संकटांपासून दूर राहू शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो. दरम्यान आपल्या चाणक्य नीतिमध्ये आचार्यांनी नातेसंबंधासह आर्थिकबाबतही मार्गदर्शन केले आहे. माणसाकडे पैसे कसे टिकतील याची माहितीही चाणक्य देतात. चाणक्य म्हणतात की, लक्ष्मी माता कोणाकडेच राहत नाही. जर एखाद्या व्यक्तीने काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर त्याला करोडपतीपासून कंगाल व्हायला वेळ लागत नाही.(If you make this mistake when you are a millionaire, you will become poor, know because otherwise you will regret it )

अधिक वाचा  : ट्विटरच्या निळी दांडीचा वाढला भाव, दरमहा भरावा लागेल शुल्क

लक्ष्मी माताला कसे प्रसन्न कराल

चाणक्यांनी नीतिशास्त्रात माता लक्ष्मीला कसे प्रसन्न कसे करावे हे देखील सांगितले आहे. तसेच कोणत्या गोष्टींमुळे माता लक्ष्मी नाराज होत असते हेही सांगितले आहे. या नाराजीमुळे करोडपती व्यक्तीही गरीब होत असतात. 

अन्यायोपार्जितं वित्तं दशवर्षाणि तिष्ठति .
प्राप्ते चैकादशे वर्षे समूलं तद् विनश्यति ..

चाणक्य नीतिमधील या श्लोकाचा अर्थ असा आहे की, जे लोक चोरी, जुगार, अन्याय आणि फसवणूक करून पैसा कमावतात, ते लवकर श्रीमंत होतात पण त्यांची संपत्ती नष्ट व्हायला वेळ लागत नाही. फसवणूक करून किंवा एखाद्याला दुखवून कमावलेला पैसा जीवनात अनेक समस्या घेऊन येतो. त्यामुळे शॉटकट मार्गाने श्रीमंत होण्याचा कधीही प्रयत्न करू नका.

अधिक वाचा  : हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी 10 मिनिटे करा हा व्यायाम

वाईट कृत्ये

आत्मापराधवृक्षस्य फलान्येतानि देहिनाम् .
दारिद्रयरोग दुःखानि बन्धनव्यसनानि च ..

जे वाईट कर्म करतात, त्यांना त्याचे वाईट फळही भोगावे लागते. जर तुम्हाला लक्ष्मी माताचा आशीर्वाद नेहमी मिळवायचा असेल तर नेहमी सत्कर्म करा. पैशाचा सदुपयोग करा. दानधर्म करा. खोटे बोलू नका, कोणाचेही नुकसान करू नका.

धनहीनो न च हीनश्च धनिक स सुनिश्चयः .
विद्या रत्नेन हीनो यः स हीनः सर्ववस्तुषु ..

या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणजे कोणालाही गरीब समजू नये. विशेषत: विद्वान व्यक्तीला गरीब समजून त्याचा अपमान करण्याची चूक करू नका. कारण ज्ञान हे सर्वात मोठे रत्न आहे, ती संपत्ती आहे जे नेहमी माणसाच्या जवळ असते. अशा व्यक्तीला समाजात सन्मान तर मिळतोच, पण त्याच्याकडे पैशाचीही कमतरता नसते. त्यामुळे तुमचे ज्ञान वाढवण्यावर भर द्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी