Vastu Tips:हनुमानाचे घरात फोटो लावायचे आहेत, मग जाणून घ्या काही गोष्टी कोणत्या फोटोमुळे होईल फायदा

घरामध्ये भगवान पंचमुखी हनुमान चित्र लावणे खूप शुभ मानले जाते. या पंचमुखी हनुमानाचा फोटो लावला तर आपल्या घरात सुख-समुद्धी येत असते. या फोटोमुळे वास्तुदोष दूर होत असतात. पंचमुखी हनुमानाचे फोटो घराच्या मुख्य ठिकाणी लावावे जेणेकरून ते सर्वांच्या नजरेस पडेल. घराच्या मुख्य दरवजावर हा फोटो लावणे खूप शुभ मानले जाते.

Vastu Tips
घरात हनुमानाचा फोटो 'या' दिशाला लावल्यानं होईल फायदा   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पंचमुखी हनुमानाचे फोटो घराच्या मुख्य ठिकाणी लावावे जेणेकरून ते सर्वांच्या नजरेस पडेल.
  • तुमच्यामधील आत्मविश्वास कमी राहत असेल तर घरात डोंगर उचलणाऱ्या हनुमानाचा फोटो लावावा.
  • बसलेल्या हनुमानाचा फोटो हा दक्षिण दिशेला लावावा.

Hanumanji Photo: हनुमानजींना (Hanuman) संकटमोचन म्हणतात. हनुमानजींची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात.  यासाठी बहुतेक भक्त (Devotee)आपल्या घरात भगवान हनुमान यांचे फोटो लावतात. घरात भगवान हनुमानाचा फोटो लावणे शुभ मानले जाते, पण हे फोटो लावण्याचे काही नियम आहेत. हनुमानाचे फोटो चुकीच्या जागी लावल्यास ते जीवनात संकटाचे कारण बनू शकते. भगवान हनुमानाचे (Lord Hanuman) योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी फोटो लावल्याने वाईट शक्ती दूर होतील आणि जीवनात आनंद येईल. (If you want to install pictures of Hanuman in the house, then know some things which pictures will be beneficial)

अधिक वाचा : मुंबईत डिलिव्हरी बॉयकडून कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

पंचमुखी हनुमानाचा फोटो

घरामध्ये भगवान पंचमुखी हनुमान चित्र लावणे खूप शुभ मानले जाते. या पंचमुखी हनुमानाचा फोटो लावला तर आपल्या घरात सुख-समुद्धी येत असते. या फोटोमुळे वास्तुदोष दूर होत असतात. पंचमुखी हनुमानाचे फोटो घराच्या मुख्य ठिकाणी लावावे जेणेकरून ते सर्वांच्या नजरेस पडेल. घराच्या मुख्य दरवजावर हा फोटो लावणे खूप शुभ मानले जाते. पंचमुखी हनुमानाचा हा फोटो घरात येणारी वाईट शक्ती वाईट नजरेपासून आपले संरक्षण होत असते. याच फोटोप्रमाणे अजून काही फोटो आहेत, हे फोटो घरात लावले तर आपल्याला त्याचे फायदे होत असतात. पण त्यांची जागा चुकली तर आपल्याला नुकसान होत असते. 

 डोंगर उचलणारे हनुमान 

 तुम्ही कुठे बाहेर जात आहात पण मनात भीती राहते. भीती नेहमी तुमच्या मनात राहत असेल. तसचे तुमच्यामधील आत्मविश्वास कमी राहत असेल तर घरात डोंगर उचलणाऱ्या हनुमानाचा फोटो लावावा. हा  फोटो तुमचे धाडस आणि शक्ती वाढवेल. 

अधिक वाचा :  आदित्य ठाकरेंचे दारू पार्ट्यांचे व्हिडिओ दाखवणार शिंदे गट

हवेत उडणारे हनुमान 

उडणारे हनुमानाचा फोटो घरात लावल्याने प्रगतीचा मार्ग उघडत असतो. करिअरमध्ये काही मिळवायचे असेल तर हा फोटो लावावा. हवेत उडणाऱ्या हनुमानाचा फोटो लावल्याने तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. यशाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील.

पांढऱ्या रंगाचे हनुमान 

पांढऱ्या रंगाचे हनुमान म्हणजे वृद्ध झाले हनुमान. हा फोटो लावल्याने आपल्याला यश मिळत असते. नोकरीमध्ये आपल्याला पदोन्नती हवी असेल तर वृद्ध हनुमानाचे फोटो घरात लावावे. 

अधिक वाचा  : या प्रसिद्ध उद्यानाखाली पुरलेले आहेत 20 हजार मृतदेह

रामदरबारचा फोटो 

रामदरबाराचे फोटो घराच्या मुख्य हॉलमध्ये किंवा बैठकीच्या ठिकाणी लावावे. बैठकीच्या हॉलमध्ये हे फोटो लावल्याने जीवनात आनंद मिळत असतो. 

दक्षिण दिशेला हनुमानाचा फोटो लावणे 

बसलेल्या हनुमानाचा फोटो हा दक्षिण दिशेला लावावा. या दिशेला फोटो लावल्यास शुभ मानले जाते. हनुमानाची कृपा आपल्यावर होत असते. जीवनातून समस्या दूर होतात. कुटुंबातील सदस्यांपासून रोग दूर होतात. दक्षिण दिशेला हनुमानाचा फोटो लावल्याने वाईट शक्ती दूर होतात. 

उत्तर दिशेत हनुमानाचा फोटो लावल्यास 

फोटोमध्ये हनुमान उत्तर दिशेकडे पाहत असेल तर फोटो भगवान हनुमान आपल्यावर प्रसन्न होत असतात. हनुमानाचा फोटो लावल्याने पैशाची सर्व समस्या सुटून जात असतात. 

(Disclaimer: हा लेख  सामान्य समजुतींवर आधारित आहे. टाइम्स नाऊ याला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी