Importance of Rudraksha: हिंदू धर्मात रुद्राक्ष हे शुभ मानले जाते. भगवान शंकराच्या अश्रूंपासून रुद्राक्षची निर्मिती झाली अशी अख्यायिका आहे. त्यामुळे भगवान शंकर आणि रुद्राक्षचे एक नाते आहे. रुद्राक्षबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. पण अनेक ठिकाणी शंकराच्या अश्रूंपासूनच रुद्राक्ष बनले असे मानले जाते. वास्तूशास्त्रातही रुद्राक्षचे महत्त्व आहे. वास्तूशास्त्रानुसार रुद्राक्षामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं. जाणून घेऊन रुद्राक्षच्या निर्मिती आणि भगवान शंकराच्या जीवनातील रुद्राक्षचे महत्त्व.
अधिक वाचा : श्रावण २०२२ : श्रावणात भगवान शिवाला प्रिय ५ झाडे घरात लावल्यावर होतील अनुकूल परिणाम
पौराणिक ग्रंथानुसार भगवान शंकराच्या अश्रूंपासून रुद्राक्षची निर्मिती झाली आहे. रुद्राक्ष आणि भगवान शंकराचे अतूट नाते आहे. देवी भागवत पुराणानुसार त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस ऋषी मुनींना त्रास देत होता. राक्षस त्रिपुरासूरचा त्रास संपवण्यासाठी ऋषीमुनींनी भगवान शंकराकडे धाव घेतली. त्यांचे दुःख ऐकून भगवान शंकराला झोप आली, जेव्हा ते उठले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू पडले आणि त्यातील काही थेंब पृथ्वीवर पडले. याच अश्रूंच्या थेंबापासून रुद्राक्ष बनले असे सांगितले जाते.
अधिक वाचा : Vastu Tips : या गोष्टी घरात ठेवू नयेत, नाहीतर तुम्हाला आर्थिक संकटाला जावे लागेल सामोरे
रुद्राक्ष म्हणजे भगवान शिव आणि त्यांचे डोळे. असे म्हटले जाते जिथे भगवान शंकराचे अश्रू पृथ्वीवर पडले तिथे रुद्राक्षचे रोप उगवले. त्यामुळे भगवान शंकराला रुद्राक्ष फार प्रिय आहे. रुद्राक्ष गळ्यात घालून भगवान शंकराची पुजा केल्यास भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात असे सांगितले जाते.
अधिक वाचा : घरात किंवा आजूबाजूला लावा अशोकाचं झाड, वास्तुदोष दूर होण्यापासून होतील अनेक फायदे
भगवान शिवाच्या अश्रूंपासून रुद्राक्षची निर्मिती झाली, म्हणून भगवान शिवाला रुद्राक्ष फार प्रिय आहे. धार्मिक ग्रंथानुसार रुद्राक्ष घालून भगवान शंकराची आराधना केल्यास भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात. अनेक प्रकारे रुद्राक्ष उपलब्ध आहेत प्रंतु एकमुखी रुद्राक्षला भगवान शिवाचे रुप मानले जाते. एकमुखी रुद्राक्ष घातल्यास भगवान शंकरासह सुर्यदेवाचेही आशिर्वाद प्राप्त होता.
अधिक वाचा : Jyotish Tips: घरात ठेवलेली मूर्ती भंग पावली तर घाबरू नका; तर हे करा उपाय