Vishnu Rekha in Palm: मुंबई : हस्तरेषा शास्त्रात हातावरील रेषा, आकृती, खुणा, तीळ यावरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, भविष्य सांगितले जाते. हस्तरेषा शास्त्रामुळे व्यक्तीचे आरोग्य, आर्थिक स्थिती, भविष्य, कौटुंबिक स्थिती आणि आयुष्यात येणारे संकटांवर माहिती मिळवता येते. अशाच प्रकारे जाणून घेऊया एका हस्तरेषेबद्दल. ही हस्तरेषा खुप शुभ मानली जाते. या हस्तरेषेचे नाव आहे विष्णु रेखा. ही रेखा ज्यांच्या हातावर असते ते लोक खुप नशबीवान असते.
हृदय रेखा ते गुरु पर्वत दरम्यान दोन भागात विभागलेल्या रेषेला विष्णू रेखा म्हणतात. ही रेख फार दुर्मिळ समजली जाते आणि फार कमी लोकांच्या हातावर ही रेष असते. अशा लोकांवर भगवान विष्णूची विशेष कृपा असते. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात संकट कमी असतात तसेच प्रत्येक वेळी त्यांना नशीबही साथ देतं.
ज्या लोकांच्या हातावर ही विष्णूरेषा असते त्यांना आपल्या क्षेत्रात खुप यश मिळतं. त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी मिळते. त्यांना आयुष्यात चांगला मान सन्मान मिळतो, या लोकांच्या स्वभावात भित्रेपणा नसतो आणि एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास असतो. हे लोक इमानदार असतात आणि त्यांची वागणूकही चांगली असते.
(Disclaimer:सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात करण्यात आली आहे. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही)