नाशिक : पौष वद्य षट्तिला एकादशीला (Ekadashi) श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेचे आयोजन केले जाते. त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रा उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. लाखो वारकरी संत निवृत्तीनाथांच्या (Saint Nivruttinath) दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरला जात असतात. दोन वर्षानंतर ही यात्रा होत असल्यानं भाविकांमध्ये यात्रेविषयी मोठा उत्साह आहे. माऊली तुम्हीही यंदा या यात्रेला जाण्याचा प्लान केलाय ना. पण माऊली तुम्हाला ही यात्रा कधीपासून सुरू झाली याची काही माहिती आहे का? नाही ना, काळजी नको आम्ही तुम्हाला याची माहिती या लेखात देत आहोत. (Information about the history of Saint Nivruttinath Maharaj's yatra )
अधिक वाचा : संभाजी महाराजांविषयी 'या' गोष्टी माहिती आहेत का?
यंदा 500 हुन अधिक दिंड्या, तर 3 लाखांहून अधिक वारकरी त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल होणार आहेत.येत्या 16 ते 20 जानेवारी दरम्यान त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव होणार आहे. ही यात्रा षट्तिला एकादशीच्या दिवशी होत असून यावेळी संत निवृत्तीनाथ महाराज समाधीची महापूजा होते. पहाटे पुन्हा नाथच्या समाधीची शासकीय महापुजेने यात्रा उत्सव सुरू होतो. संत निवृत्तीनाथ महाराज यांनी संजीवन समाधी घेतली. संत निवृत्तीनाथ महाराजाच्या समाधीला 723 वर्ष झाले आहेत.
अधिक वाचा : Winters Ladoo : थंडीच्या दिवसांत खा 3 प्रकारचे लाडू
निवृत्तीनाथ महाराज यांनी नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली. गैनीनाथ वा गहिनीनाथ हे निवृत्तिनाथांचे गुरू होते. सुमारे तीन-चारशे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना, निश्चितपणे निवृत्तिनाथांची आहे, असे म्हणता येईल. योगपर, अद्वैतपर आणि कृष्णभक्तिपर, असे अभंग त्यांनी रचले आहेत. निवृत्तिनाथांची ख्याती आणि महत्त्व केवळ कवी म्हणून नाही, तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक म्हणून अधिक आहे.
अधिक वाचा : जाणून घ्या 12 राशींसाठी कसा असेल16 जानेवारीचा दिवस
ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई, निवृत्तीनाथ हे चार भावंड होते. या भावंडामध्ये निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. त्यांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असलेली गीता सोप्या भाषेत लिहिण्यास सांगितलं होतं. एकनाथ असो की नामदेव, सेना महाराज असो की चोखोबा, जनाबाई असो की कान्होपात्रा, तुकाराम महाराज असो की निळोबाराय, सोपान असो की मुक्ताई, या सर्व संतांनी निवृत्तिनाथांचे गुणगायन एकनाथ असो की नामदेव, सेना महाराज असो की चोखोबा, जनाबाई असो की कान्होपात्रा, तुकाराम महाराज असो की निळोबाराय, सोपान असो की मुक्ताई, या सर्व संतांनी निवृत्तिनाथांचे गुणगायन केला आहे.
दरम्यान संत नाथांनी जून महिन्यात संजीवन समाधी घेतली होती. परंतु ही यात्रा पौष वद्य एकादशी तिथीला यात्रा भरवण्याचा निर्णय तत्कालीन तेव्हाच्या संतांनी घेतला. आषाढ महिन्यात पंढरपूरची यात्रा असल्याने वारकरी विठूारयाच्या दर्शनासाठी पायी चालत-चालत वारी करत असतात. त्यामुळे या दिवसात ही यात्रा करणं अशक्य आहे.
तर कार्तिक महिन्यातही आळंदीची यात्रा असते. ही कारणे लक्षात घेऊन तत्कालीन संतांनी सातशे वर्षापूर्वी समाधी सोहळ्यानंतर संत निवृत्तीनाथांची यात्रा पौष वारी पौष वद्य एकादशीला घेण्यात यावी, असं ठरविण्यात आले, तेव्हापासून ही यात्रा भरविण्यात येत असल्याचं म्हटलं जातं. या यात्रेनिमित्त पायी दिंड्या व वारकरी भाविक या लोक गंगेचा महापूर त्र्यंबकेश्वर कडे वळतो.
1219 पासून निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीची पूजा केली जाते. तेव्हापासून त्या समाधिची पूजा-अर्चा करण्यासाठी श्री चांगदेव महाराजांचे शिष्य त्र्यंबकेश्वर येथे राहात होते. तेव्हापासून ही परंपरा आजतागायत सुरूआहे. सुरुवातीला ही परंपरा गुरूशिष्य परंपरेप्रमाणे चालत असे.
मात्र आता ही परंपरा वंशपरंपरेने केली जाते. गोसावी समाजात जन्मालेला व्यक्ती समाधीची पूजा करत आहेत. आधीच्या काळात या मंदिराचे व्यवस्थापन या कुटुंबामार्फत केलं जातं होतं. परंतु 1950 पासून धर्मदाय ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर ट्रस्टच्या माध्यमाने मंदिराचे व्यवस्थापन केले जाते.