घरी कावळा येणे शुभ असते की अशुभ? शकुन शास्त्रात दिलेत याचे संकेत

धर्म-कर्म-भविष्य
Updated May 11, 2022 | 12:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

आपल्या घरांच्या छतावर कावळ्यांना बसलेले अथवा दाणे टिपताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल. अनेक लोकांना हे समजत नाही की घरावर कावळे बसणे अथवा रस्त्यात दिसणे हे शुभ असते की अशुभ. आज आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत.

crow
घरी कावळा येणे शुभ असते की अशुभ? शकुन शास्त्रात याचे संकेत 
थोडं पण कामाचं
  • अनेकदा घराच्या छतावर कावळ्यांची मोठी झुंड येऊन जोरजोरात आवाज करण्याचे दृश्य तुम्ही पाहिले असेल.
  • शकुन शास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते याचा अर्थ असतो की त्या घराच्या मालकावर लवकरच संकट येणार आहे.
  • शकुन शास्त्रानुसार जर एखादा कावळ एखाद्या भांड्यात पाणी पिताना दिसला तर ते शुभ मानले जाते.

मुंबई: शकुन शास्त्रानुसार घराच्या छतावर कावळे येणे शुभ मानले जाते. मान्यता आहे की निसर्गाने कावळ्यांना भविष्य बघण्याची अद्भुत शक्ती दिली आहे. यामुळे येणाऱ्या वेळेआधीच ते अनुमान लावतात आणि तुम्हाला त्याबाबत जागरूक करण्यासाठी घराच्या छतावर येतात. जाणून घ्या काय आहेत हे संकेत...

अधिक वाचा - Exercise: या एक्सरसाईजने १ महिन्यात कमी होईल ब्रेस्ट साईज

शकुन शास्त्रानुसार जर एखादा कावळ एखाद्या भांड्यात पाणी पिताना दिसला तर ते शुभ मानले जाते. याचा अर्थ असतो की नजीकच्या काळात तुम्हाला भविष्यात धनलाभ होऊ शकतो. अथवा एखाद्या कामात मोठे यश मिळू शकते. 

अनेकदा घराच्या छतावर कावळ्यांची मोठी झुंड येऊन जोरजोरात आवाज करण्याचे दृश्य तुम्ही पाहिले असेल. शकुन शास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते याचा अर्थ असतो की त्या घराच्या मालकावर लवकरच संकट येणार आहे. अथवा ती व्यक्ती आर्थिक संकटात बुडणार आहे. अथवा घरात कलह सुरू होण्याची शक्यता मानली जाते. 

मान्यता आहे की जर सकाळच्या वेळेस उडत्या कावळ्याने कोणाच्या पायाला स्पर्श केला तर ते खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ अतो की त्या व्यक्तीला समाजात मान-सन्मान वाढणार आहे. सोबतच त्या व्यक्तीचे बिघडलेले काम पूर्ण होणार आहे. 

जर तुम्हाला कावळ्याच्या तोंडात खाण्याची गोष्ट अथवा भाकरीचा तुकडा दिसला तर ते चांगले मानले जाते. शकुन शास्त्रानुसार कावळ्याला या अवस्थेत पाहणे हे या गोष्टीचे संकेत असते की तुमची लवकरच मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. 

अधिक वाचा - नाशिकमध्ये कारचा अपघात, चौघांचा मृत्यू

जर कावळा घराच्या मुख्य दरवाजावर येऊन काव-काव करत असेल तर तुमच्याघरी कोणीतरी पाहुणा येणार आहे. याची सूचना कावळा आपल्याला देत असतो. हे घरात लक्ष्मी माता म्हणजेच धन आगमनाचेही प्रतीक असते. का
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी