मुंबई: हिंदू धर्मात(hindu religion) प्रत्येक जीवाबद्दल लिहिले आहे. ग्रंथांमध्ये घराच्या आत आणि बाहेर लावणाऱ्या झाडांबद्दल सांगितले आहे. मात्र घराच्या आत हळदीचे झाड(turmeric plant) लावता येते का? वास्तुशास्त्र आणि धर्मग्रंथ याबद्दल काय सांगतात. जाणून घेऊया...Is turmeric plant should be in house or out of house?
अधिक वाचा - Eknath Shinde यांच्या मानगुटीवर बसून 'ऑपरेशन कमळ'
ज्योतिषानुसार हळदीचे रोप आरोग्य आणि धार्मिकरित्या शुभ मानले जाते. तुम्ही कुंडीत हळदीचे रोप लावू शकता. असे केल्याने केवळ तुमचे आरोग्यच सुधारत नाही तर आर्थिक समस्यांपासूनही सुटका होते. घरात हळदीचे रोप लावल्याने सकारात्मकतायेते याचा परिणाम पूर्ण कुटुंबावर होतो.
घरात हळदीच्या रोपाला नियमिपतणे पाणी घालणे तसेच खाद्य घालणे गरजेचे असते. या झाडाला साफ-सफाई गरजेची असते. त्यामुळे याच्या बाजूला घाण होऊ देऊ नका. असे मानले जाते की लक्ष्मी मातेला हळदीचे झाड प्रिय असते. ज्या घरात साफ-सफाई असते तेथे लक्ष्मी मातेची कृपा राहते.
वास्तुशास्त्रानुसार हळदीच्या झाडाचे एक वैशिष्ट्य असते ते म्हणजे ज्या घरात हे झाड लावले जाते तेथील कुटुंबामध्ये आपापसात स्नेह वाढतो. नकारात्मकता निघून जाते. गुरूवारी भगवान विष्णूला हळदीचा टिळा लावला जातो. त्यामुळे भक्तांना मनासारखे यश मिळते.
अधिक वाचा - बर्मिंगहॅम कसोटीपूर्वी विराटची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
हळदीचे झाड घरातील वास्तुदोष दर करण्यास मदत करतात. हळदीला आग्नेय दिशेला ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. तसेच घरातील लोकांचा आपापसातील स्नेह वाढवण्यासाठी हे रोप उत्तर-पश्चिम दिशेला ठेवले पाहिजे. योग्य दिशेला हळदीचे रोप लावल्याने चांगले फळ मिळते. तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते.