तुमचे मूल अभ्यासाचा कंटाळा करतयं? या ज्योतिष उपायांनी मिळू शकते मदत 

Astro Tips: जर तुमच्या मुलाला अभ्यासात अजिबात आवडत नसेल आणि तुम्हाला समजावून उपयोग होत नसेल तर हे ज्योतिषीय उपाय तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात.

Is your child bored of studying? These astrological remedies can help
तुमचे मूल अभ्यासाचा कंटाळा करतयं? या ज्योतिष उपायांनी मिळू शकते मदत   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ऑनलाईन शिक्षणाची पद्धत आल्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासातून लक्षच उडाले आहे.
  • मोबाईल, गेम्स, व्हिडीओ अशा गोष्टींमुळे मुलांना अभ्यासात गोडी राहिली नाही.
  • तुमची मुलंही अभ्यास करत नसतील तर आम्ही आज तुम्हाला मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याच्या काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत

मुंबई : प्रत्येक मुलाची स्वतःची वैशिष्ट्ये आणि आवडी-निवडी असतात. काही मुलं दिवसभर मोबाईलमध्ये मग्न असतात आणि अभ्यासच नाव ऐकताच अनेकांची पळापळ होते. अशा परिस्थितीत, जर तुमच्या मुलाला अभ्यासात अजिबात आवडत नसेल, तर हे ज्योतिषीय उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. (Is your child bored of studying? These astrological remedies can help)

अधिक वाचा : Dream Astro:स्वप्नात थोबाडीत मारताना पाहणे याचा काय आहे अर्थ

1. ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुमच्या मुलाला अभ्यासात अजिबात आवडत नसेल तर तुम्ही त्याच्या खिशात फिटकरीचा एक छोटा तुकडा ठेवावा आणि दररोज आपल्या मुलाच्या कपाळावर आणि नाभीला कुंकू तिलक लावा.

2. मुलांची अभ्यासाची आवड वाढवण्यासाठी प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णूच्या मंदिरात आपल्या कुवतीनुसार धार्मिक पुस्तके आणि पेन दान करणे देखील शुभ मानले जाते.

अधिक वाचा : Hanuman Jayanti 2022 Messages: हनुमान जयंतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Wishes, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून  शेअर करा 

3. ज्योतिष शास्त्रानुसार भगवान विष्णूच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावणे, केळीच्या झाडाला जल अर्पण करणे आणि तिथल्या मातीपासून बालकाला तिलक लावणे देखील फायदेशीर मानले जाते.

अधिक वाचा : Donation Tips: उन्हाळ्याच्या दिवसात दान करण्याच्या या टिप्स तुम्हाला बनवतील श्रीमंत
4. तुमचे मूल ज्या ठिकाणी अभ्यास करते, त्या ठिकाणी त्याच्या अभ्यासाच्या टेबलाचे तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे.

5. एवढेच नाही तर ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की जर मुलाच्या खोलीचे दार बाथरूम किंवा पायऱ्यांसमोर उघडले तरी त्याच्या एकाग्रतेवर नकारात्मक प्रभाव पडतो, ज्यामुळे मुलाला अभ्यासात मन लागत नाही. त्यामुळे मुलांच्या खोलीचा दरवाजा कधीही बाथरूम किंवा पायऱ्यांसमोर नसावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी