मुंबई: ज्योतिषशास्त्रात(astrology) गुरू ग्रहाला(jupiter) शुभ ग्रह मानण्यात आले आहे. जर गुरू शुभ असला तर व्यक्तीचे वैवाहिक जीवन(married life), आर्थिक स्थिती(economic condition) चांगली राहते त्याला नशीबाची पूर्ण साथ मिळते. कामांमध्ये यश मिळते. गुरू ग्रह साधारणत: एका वर्षाने रास बदलतो. यावर्षी एप्रिलमध्ये गुरूने राशी परिवर्तन करत मीन राशीत प्रवेश केला आहे. आता गुरू मीन राशीत(pisces) एक वर्ष राहणार आहे आणि या दरम्यान ३ राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. वक्री गुरू सर्व १२ राशींवर परिणाम करणार आहहे मात्र ३ राशींना याचा छप्परफाड लाभ होणार आहे. ३ राशींसाठी वक्री गुरू अतिशय शुभदायक ठरणार आहे.(jupitar transistion will good effect on this 3 zodiac sign)
अधिक वाचा - प्रेयसी सबा आझादसोबत हृतिक रोशन लग्नबंधनात अडकणार
वृषभ - गुरू राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू झाले आहेत. याचा शुभ परिणाम वेळ जाईल तसा वाढत जाईल. उत्पन्न वाढेल. धनलाभ होईल. अडकलेले पैसे मिळतील. करिअरमध्ये मोठे यश मिळेल. व्यापाऱ्यांनाही मोठा लाभ होईल. कामकाजाची पद्धत सुधारेल. मान-सन्मान वाढेल. तज्ञांच्या सल्ल्याने हिरा धारण करू शकता. यामुळे शुभ परिणाम वाढतील.
मिथुन रास - मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरू गोचर शुभ आहे. या राशीच्या लोकांना कामकाजात यश मिळेल. नवी नोकरी मिळू शकते. प्रमोशन-इन्क्रीमेंट मिळेल. पदोन्नती होण्याची दाट शक्यता आहे. बदली होऊ शकते. व्यापाऱ्यांचे नेटवर्क वाढेल. व्यापारात वृद्धी होईल. चांगल्या परिणामांसाठी तज्ञांच्या सल्ल्याने पन्ना अथवा पुष्कराज धारण करू शकता.
अधिक वाचा - व्यावसायिकानं कारमध्येच घेतलं स्वतःला पेटवून
कर्क रास- गुरूची मीन राशीतील प्रवेश कर्क राशीसाठी शुभ आहे. या व्यक्तीला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. कामांमध्ये यश मिळेल. दीर्घकाळापासून थांबलेली कामे पूर्ण होतील. प्रॉपर्टी संबंधी जी प्रकरणे अडकली होती ती आता सुटतील. व्यापाऱ्यांना लाभ होईल. प्रवास होतील. प्रवासातून लाभ होतील. खाण्यापिण्याशी संबंधित व्यापारात मोठा लाभ होईल.