Kalashtami 2022: या महिन्याच्या 16 तारखेला कालाष्टमी (Kalashtami)आहे. या दिवशी भगवान महादेवाच्या (Lord Mahadev)रौद्र अवताराची पूजा केली जाते. या दिवशी कालभैरवची (Kalbhairav)विधीपू्र्वक पूजा केल्यास आपली आर्थिक प्रगती होते अशी मान्यता जनमाणसात आहे. जो व्यक्ती प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील (krishna paksha)अष्टमी तिथीला बाबा काल भैरवाची पूजा (Worship) करतो, त्याला अशुभ ग्रह आणि शत्रू कधीच त्रास देत नाहीत, असंही म्हटलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी कालभौरवाशिवाय माँ दुर्गेचीही पूजा केली जाते. भगवान शिव आणि माता पार्वतीचीही पूजा या दिवशी केली जाते. ( Kalashtami 2022: Worship Lord Kaal Bhairav, Date,Puja time, Singinificance, rituals)
अधिक वाचा : सीमावादावर दिल्लीत पार पडली बैठक, नेमकं काय ठरलं? वाचा
कालभैरवाची पूजा तामसिक आणि दुसरी सात्विक या दोन प्रकारे केली जाते. तांत्रिक आणि अघोरी सिद्धी मिळविण्यासाठी बाबा भैरवनाथाची तंत्र-मंत्रानेही पूजा केली जाते. दुसरीकडे, ग्रहस्थी जीवनातील लोक आपल्या नेहमीप्रमाणे या दिवशी काळभैरवाच्या पूजेमध्ये मग्न असतात. शास्त्रानुसार कालाष्टमीला कालभैरवाच्या पूजेमध्ये काही विशेष वस्तू अर्पण केल्यास विशेष फळ मिळते. चला जाणून घेऊया.
कालाष्टमी 2022 शुभ मुहूर्त (Kalashtami 2022 Muhurat)
ज्योतिषशास्त्रानुसार पौष महिन्यातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाईल. अष्टमी तिथि 16 दिसंबर 2022 दिवशी रात्री 1.39 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 17 डिसेंबर 2022 रोजी पहाटे 3.02 वाजेपर्यंत राहील. पंचांगानुसार कालाष्टमी 16 डिसेंबर रोजी साजरी केली जाईल.
अधिक वाचा : कधीच दान करू नका या वस्तू , नाहीतर होतील वाईट परिणाम
कालाष्टमी पूजा विधी (Kalashtami 2022 Puja Vidhi)
कालाष्टमीच्या दिवशी भगवान कालभैरवाला नारळ, गेरू सिंदूर, इमरती, पान अर्पण करा आणि नंतर "ॐ तीखदन्त महाकाय कल्पान्तदोहनम्। भैरवाय नमस्तुभ्यं अनुज्ञां दातुर्माहिसि।" या मंत्राचा जाप करावा. या पद्धतीने पूजा केल्याने शनि, राहू-केतूच्या त्रासापासून आराम मिळतो. हनुमानानंतर काल भैरव असे देव आहेत, ज्यांची पूजा-अर्चा केल्याने लवकर फळ मिळते.
काळभैरवाचे वाहन कुत्रा मानले जाते. कालभैरवांना प्रसन्न करण्यासाठी कालभैरव जयंतीच्या दिवशी विशेषत: काळ्या कुत्र्याला खायला द्यावे. यामुळे अकाली मृत्यूचे भय राहत नाही आणि केतूलाही शांती मिळते.