नवी दिल्ली: Vastu Tips For Bathroom Positivity: प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वास्तुशास्त्राला (Vastu) खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडत असताो. वास्तूमध्ये दिशा आणि रंग महत्त्वाचे मानले जातात. रंगांबद्दल बोलायचे झालं तर रंगांचा माणसाच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. वास्तूनुसार योग्य रंगांची निवड केल्यास व्यक्ती अनेक समस्यांपासून मुक्त होण्याची शक्यता अधिक असते. यासोबतच वास्तुदोषही दूर होतात. प्रत्येकजण बाथरूममध्ये बादलीचा (Bucket) वापर करतो. प्रत्येक घराच्या बाथरूममध्ये बादली असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की बाथरूममध्ये ठेवलेल्या बादलीचा रंग तुमचे नशीब बदलू शकतो. होय, वास्तुशास्त्रानुसार, (Vastu Shastra) बहुतेक वास्तु दोष बाथरूममध्येच उद्भवतात. ज्याचा जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो. अशा स्थितीत बाथरूममध्ये निळी बादली ठेवल्यास वास्तुदोष (Vastu Dosha) दूर होतो. यासोबतच वास्तूमध्ये बाथरूमबाबतही अनेक नियम सांगण्यात आले आहेत.
बाथरूममध्ये निळ्या रंगाची ठेवा बादली
बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली ठेवणं खूप शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये निळी बादली ठेवल्यानं घरात सुख-समृद्धी येते आणि वास्तुदोष दूर होतात. वास्तूनुसार बाथरूमसाठी निळ्या रंगाची बादली सर्वोत्तम असते. तसेच बाथरूममध्ये ठेवलेली बादली कधीही रिकामी ठेवू नये हे लक्षात ठेवा.
अधिक वाचा- राज्यात रेल्वेचा मोठा अपघात, ट्रेनच्या धडकेत रूळावरून घसरले तीन डब्बे; सुदैवानं जीवितहानी टळली
निळ्या रंगामुळे दूर राहतील राहु-केतू दोष
वास्तूशास्त्रानुसार निळा रंग शनि आणि राहूच्या अशुभ प्रभावापासून आराम देतो. जर तुम्ही शनि आणि राहूच्या दोषांमुळे त्रस्त असाल तर तुम्ही निळ्या रंगाचा वापर जास्त करावा. बाथरूममध्ये बादलीसोबत निळ्या रंगाचा मग, टॉवेल, रुमाल इत्यादी ठेवू शकता.
बाथरूममध्ये कधीही ठेवू नका रिकामी बादली
बाथरूम घरापासून थोडे दूर असले तरी ते वेगळे आणि साधे असते. पण वास्तूचे नियम पाळले नाहीत तर खूप नुकसान होऊ शकते. वास्तु नियमानुसार बाथरूममध्ये ठेवलेली बादली कधीही रिकामी ठेवू नये. एकतर बादलीत पाणी भरून ठेवा किंवा बादली वापरायची नसेल तर ती उलटी ठेवा. रिकामी बादली ठेवल्यानं वास्तुदोष होतो.
बाथरूमसमोर आरसा लावू नका
सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावामुळे घरामध्ये शुभ आणि अशुभ प्रभाव पडतात. वास्तूनुसार बाथरूमच्या दरवाजासमोर आरसा किंवा काच लावू नये. नियमानुसार बाथरूमसमोर आरसा लावल्याने बाथरूममधून बाहेर पडणारी नकारात्मक ऊर्जा आरशावर आदळल्यानंतर घराच्या इतर भागात पसरते. घरातील सुख-समृद्धी या दोन्हींसाठी हे घातक ठरू शकते.
(अस्वीकरण: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामान्य समजुती आणि सामग्रीवर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)