१६ मार्च पासून सुरू होत आहे खरमास. एक महिना शुभ कार्यासाठी मुहूर्त नाही

धर्म-कर्म-भविष्य
Updated Mar 17, 2023 | 15:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kharmas 2023: खरमास मध्ये सर्वप्रकारची शुभ कार्ये निषिद्ध मानली जातात.

Kharmas month starting this month is not good for auspicious work.
खरमास  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • Kharmas 2023: १६ मार्च २०२३ पासून खरमास सुरू होणार
  • हिंदू शास्त्रात खरमासचा काळ उचित मानला जात नाही
  • खरमासमध्ये लग्न, मुंज यांसारख्या इतर सर्व धार्मिक विधी करता येत नाही.

Kharmas 2023: हिंदू पंचांगानुसार जेव्हा सूर्य मीन राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होतो. यावर्षी खरमास ला १६ मार्च पासून सुरुवात होत असून, याचा प्रभाव एक महिन्यापर्यंत असणार आहे. यादरम्यान ग्रहांची स्थिति प्रतिकूल असल्याकारणामुळे,  कोणत्याही प्रकारचे शुभ आणि धार्मिक कार्ये करता येणार नाही, ज्योतिष शास्त्रानुसार हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहिले जाते. खास करून गृह प्रवेश, लग्न यांसारख्या इतर शुभ कार्यामध्ये शुभ मुहूर्ताला अधिक महत्व दिले जाते. त्यामुळे, १६ मार्च पासून पुढील एक महिना खरमास असल्याकारणामुळे कोणतेही शुभकार्य करता येऊ शकणार नाही.

जाणुयात खरमास आणि मलमास (Malmas) काय असते, तसेच यादरम्यान कोणते कार्य करणे निषिद्ध मानले जाते.

अधिक वाचा - Horoscope 15 March 2023 : मिथुन, सिंहसह या राशींसाठी धनयोग, पाहा तुमचे राशीभविष्य

एक महिना कोणतेही वैवाहिक कार्य होणार नाही

१६ मार्च २०२३ पासून एक महिना हिंदू विवाहासाठी कोणतेही मुहूर्त सापडणार नाही. घराचा पाया घालण्यासाठी किंवा मालमत्ता विकत घेण्यासाठी देखील हा कालावधी योग्य नाही. खरमास दरम्यान नवीन कामे किंवा व्यवसाय हाती घेऊ नयेत. दररोजची कार्ये सोडली तर इतर कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्य या काळात करू नयेत. खरमास काळ संपल्यानंतर म्हणजेच २० एप्रिल नंतर लग्न, गृह प्रवेश, मुंज, लहान मुलांचे कान टोचणे या सारखे सर्व शुभ कार्य सुरु करता येतील.

या दोन संक्रांती मानल्या जातात अशुभ

ज्योतिषशास्त्रानुसार एका वर्षात १२ संक्रात येत असतात. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांत असे म्हंटले जाते. जेव्हा सूर्य धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला धनु संक्रांत असे म्हंटले जाते. त्यानुक्रमे जेव्हा सूर्य मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा मीन संक्रांत होते. जेव्हा सूर्य या दोन राशीत प्रवेश करतो तो तेव्हा तो अशुभ काळ मानला जातो.

अधिक वाचा - Surya Gochar 2023: सूर्य करणार मीन राशीत प्रवेश, 'या' राशीच्या व्यक्तींना करावा लागणार अडचणींचा सामना

खरमास मध्ये काय करावे

खरमास काळात सूर्य देवाची उपासना करावी. यादरम्यान दररोज आदित्य ह्रदय स्तोत्र आणि विष्णु सहस्त्र नामाचे पठण करणे फलदायी मानले जाते. शक्य असल्यास खरमास काळात गहू, तांदूळ, आंबा, जिरे, सुपारी, मुगडाळ, जवस, तीळ, सुठ, खड्या मिठाचे सेवन करू नये. खरमास मध्ये विष्णुची पूजा करावी आणि त्या संबंधित वस्तूंचे दानधर्म करावे. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते अशी धारणा आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी