Kartik Purnima 2021: १८ की १९ कधी आहे कार्तिक पोर्णिमा? जाणून घ्या स्नान-दान आणि पुजेचा शुभ मुहूर्त

धर्म-कर्म-भविष्य
Updated Nov 18, 2021 | 12:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

कार्तिक पोर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. या दिवशी गंगा स्नान, दीपदानन आणि देवाची आराधना करण्याचे विशेष महत्त्व आहे. 

kartik pournima
१८ की १९ कधी आहे कार्तिक पोर्णिमा? जाणून घ्या  
थोडं पण कामाचं
  • १९ नोव्हेंबरला स्नान-दानाची कार्तिक पोर्णिमा साजरी केली जाणार आहे. 
  • या दिवशी काही दान केल्याने मिळतात फायदे
  • कार्तिकेय देवाची पुजा केलीजाते. 

मुंबई: पोर्णिमा तिथी(pournima tithi) दुपारी २ वाजून २६ मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर मार्गशीर्ष कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेची तिथी सुरू होईल. १९ नोव्हेंबरला स्नान-दान कार्तिक पोर्णिमा(karhik purnima) आहे. यावेळेस पोर्णिमा तिथी दोन दिवसांची असल्या कारणाने पोर्णिमा व्रत आजही केले जात आहे आणि शुक्रवारी स्नान-दान केले जाणार आहे. कार्तिक पोर्णिमेच्या दिवशी स्नान-दानाला(donate) विशेष महत्त्व आहे. सोबतच कार्तिक पोर्णिमा कृतिका नक्षत्रात असते. त्यामुळे याला महाकार्तिकी पोर्णिमा म्हणतात. शास्त्रात याचे मोठे पुण्य सांगितले आहे. कार्तिक पोर्णिमेला स्नान, दान आणि हवन यांचे खूप महत्त्व आहे. एखाद्या तीर्थस्थळी जाऊन स्नान केल्याने वर्षभरातेच तीर्थस्नानाचे लाभ मिळतात. तसेच या दिवशी दान केल्याने त्याने अनेक पट लाभ मिळतात. वास्तवात कार्तिक मासाची पोर्णिमा मनुष्याच्या आत लपलेल्या वाईट गोष्टी नकारात्मकता, अहंकार, क्रोध,लोभ, मोह, माया दूर करण्यास मदत करते. तसेच जीवनात सकारात्मकता, प्रसन्नता आणि पवित्रता आणते. know all about karthik pournima

कार्तिकेय देवाची विशेष पुजा

संपूर्ण वर्षभरात केवळ कार्तिक पोर्णिमेलाच भगवान कार्तिकेय यांचे ग्वालियर स्थित मंदिरातील कपाट उघडले जाते. त्यांची पुजा अर्चना केली जाते. बाकी वर्षभर हे मंदिर बंद असते. पौराणिक कथांनुसार एकदा कार्तिकेयकडून दर्शन न दिल्या जाण्याच्या शापाला कंटाळलेल्या माता पार्वती आणि देव शकरांनी कार्तिकेयला प्रार्थना केली आणि सांगितले की वर्षभरातून एखाद्या दिवशी तरी त्याचे दर्शन तसेच पुजा केली जाईल.तेव्हा भगवान कार्तिकेय यांनी कार्तिक पोर्णिमाला आपले दर्शन होणार असल्याचे सांगितले. यासाठी कार्तिक पोर्णिमेच्या दिवशी कार्तिके देवाच्या दर्शन आणि पुजेचे विशेष महत्त्व आहे. 

पुजा विधी

या दिवशी ब्रम्हमुहूर्तावर उठून सर्व नित्यक्रमे उरकून गंगा स्नान अथवा घरी स्नान करा. या दिवशी भगवान विष्णू आणि शंकराची रुजा केली जाते. या दिवशी उपवास केला जातो. जर उपवास करणे जमत नसेल तर एकाच वेळेस खा. यानंतर श्री सूक्त आणि लक्ष्मी स्त्रोताचे पठण करा. यामुळे महालक्ष्मी प्रसन्न होईल. रात्रीच्या वेळेस विष्णू आणि लक्ष्मीमातेची पुजा-अर्चना करा. यानंतर सत्यनारायणाची कथा ऐका. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी