Hanuman Murti Vastu tips: कशी स्थापना करावी हनुमानाच्या मूर्तीची

धर्म-कर्म-भविष्य
Updated May 04, 2021 | 16:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

वास्तुशास्त्रानुसार हनुमानाचा फोटो भिंतीवर उत्तर दिशेला आणि दक्षिणेच्या दिशेला तोंड केलेला असावा. तर बेडरूममध्ये हनुमानाची मूर्ती ठेवू नये.

Hanuman
कशी स्थापना करावी हनुमानाच्या मूर्तीची 

थोडं पण कामाचं

  • चुकूनही बेडरूममध्ये हनुमानाची मूर्ती ठेवू नका
  • सिंहासनावर मूर्ती ठेवण्याआधी लाल रंगाचे आसन ठेवा.
  • हनुमानाला रुद्राक्ष अर्पण केल्याने मन राहते स्थिर

मुंबई: प्रभू रामांना आपले सर्वस्व मानणारे आणि रामचरितमानसचे रचनाकार तुलसीदास रामचरितमानसमध्ये लिहितात की संकट कटै मिटै सब पीरा, जो सुमिरै हनुमत बल बीरा. हनुमान आपल्या भक्तांची सर्व संकटे दूर करतात. ज्या घरात हनुमानाची मूर्ती असते ते घर मंगळ, शनि, पितृ आणि भूताटकीपासून मुक्त असते. तेथे सकारात्मकतेचा वास असतो. नकारात्मक शक्तींचा नाश होतो. मात्र यासाठी हनुमानाची मूर्ती योग्य दिशेला असणे गरजेचे आहे.

कोणत्या दिशेला असावी हनुमानाची मूर्ती

वास्तुशास्त्रानुसार हनुमानाची तसबीर उत्तर भिंतीवर दक्षिणेकडे तोंड केलेली असावी. दक्षिण दिशेला हनुमानाचे तोंड यासाठी असावे कार या ठिकाणी त्यांचा प्रभाव सर्वाधिक जाणवतो. या दिशेला हनुमानाची तसबीर लावल्याने घरात येणारी नकारात्मक शक्ती परतून मागे जाते. घरात नेहमी सकारात्मकता राहते.

चुकूनही या जागी लावू नका मूर्ती

चुकूनही हनुमानाची तसबीर बेडरूममध्ये लावू नका. कारण हनुमान बाल ब्रम्हचारी होते. या नियमाचे उल्लंघन केल्यास तुम्हाला अशुभ फळ मिळू शकते.

बसलेले अथवा उडत असलेल्या तसबिरीची पुजा करा

घरात हनुमानाची तसबीर बसलेली अथवा उडत असलेली असावी. याची पुजा केल्यास घरात सुख-समृद्धी राहते. तसेच मिळकत वाढते. बसलेल्या तसबिरीची पुजा केल्यास कुटुंबात सुखसमृद्धी येते. तसेच नोकरी आणि व्यापाऱात नफा मिळवण्यासाठी उडत असलेल्या हनुमानाचा फोटो लावणे शुभ असते.

अशी करा मूर्तीची स्थापना

घरात अथवा मंदिरात हनुमानाच्या मूर्तीची स्थापना करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की डायरेक्ट सिंहासनावर स्थापना करू नका. त्याआधी सिंहासनावर लाल रंगाचे आसन ठेवा. कारण हा रंग त्यांना अत्यंत प्रिय आहे.

रुद्राक्ष माळा करा अर्पण

पवनपुत्र हनुमानाला शंकराचा ११वा अवतार मानला जातो. यासाठी त्यांना रुद्राक्ष चढवल्यास त्यांची कृपा सदैवर तुमच्यावर राहील. तसेच मनही स्थिर राहील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी