Dev Deepawali 2021: कधी आहे देव दिवाळी, जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि महत्त्व

धर्म-कर्म-भविष्य
Updated Nov 15, 2021 | 19:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dev Diwali 2021 date and puja Muhurat time 2021: देव दिवाळी कार्तिकी पोर्णिमा तिथा देवांकडून साजरा केला जाणारा सण आहे. २०२१मध्ये देव दिवाळी कधी आहे, पुजा मुहूर्त आणि याचे महत्त्व जाणून घेण्यासाठी वाचा. 

dev deepawali
Dev Deepawali 2021: कधी आहे देव दिवाळी, जाणून घ्या तिथी 
थोडं पण कामाचं
  • देवांनी साजरा केला होता त्रिपुरासुराच्या विनाशाचा जल्लोष
  • कार्तिक पोर्णिमा तिथीला साजरा केला जाता देव दिवाळीचा उत्सव 
  • देव दिवाळी २०२१ची तिथी, मुहूर्त आणि महत्त्व

Dev Deepawali 2021: देव दिवाळीचा(dev dipawali) सण दरवर्षी कार्तिक पोर्णिमेला(karthik pournima) साजरा केला जातो. उत्सव कार्तिक शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीपासून सुरू होतो आणि पाचव्या दिवशी म्हणजेच कार्तिक पोर्णिमा तिथीला समाप्त होतो. याला देव दिवाळी असे म्हणतात. कारण या दिवशी समस्त देवांनी दिवाळी साजरी केली आणि राक्षस भावांवर शंकर देवाने मिळवलेल्या विजयाचा जल्लोष साजरा केला होता. जाणून घ्या २०२१मध्ये कधी देव दिवाळी साजरी केली जात आहे. जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व know date of dev diwali, tithi, muhurt

देव दीपावली 2021 तिथि (Dev Deepawali Purnima Tithi)

या वर्षी देव दिवाळी १८ नोव्हेंबरला साजरी केली जात आहे. पोर्णिमा तिथी १८ नोव्हेंबर दुपारी १२ वाजता सुरू होईल आणि १९ नोव्हेंबरला दुपारी २.२६ ला समाप्त होईल. 

देव दिवाळी २०२१ पुजा शुभ मुहूर्त (Dev Deepawali Significance)

देव दिवाळी पूज प्रदोश कालादरम्यान केली जाते. पुजेचा मुहूर्त संध्याकाळी ५.०९ वाजल्यापासून ते संध्याकाळी ७.४७ वाजेपर्यंत आहे. 

देव दिवाळीचे महत्त्व

तारकासुरा नावाचा एक राक्षस होता ज्याचे तीन पुत्र होते. तारकक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष. तिघांनी कठोर तपस्या करून भगवान ब्रम्हाचा आशीर्वाद मागितला. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रम्हदेव त्यांच्यासमोर प्रकट झाले. तिघांनी अमरत्व मिळावे असे वरदान मागितले. मात्र हा आशीर्वाद ब्रम्हांडाच्या नियमाच्या विरुद्ध होता त्यामुळे ब्रम्हदेवांनी होकार देण्यास मकार दिला. याऐवजी त्यांनी असे वरदान दिले की जोपर्यंत एका तिराने कोणी त्यांना मारणार नाही तोपर्यंत त्यांचा अंत होणार नाही. ब्रम्हाकडून हा आशीर्वाद मिळाल्यानंतर तिघांनी सामान्यजनांना त्रास देण्यास सुरूवात केली. यामुळे मानवजातीला धोका निर्माण झाला. या राक्षसांना मारण्यासाठी भगवान शंकरांनी त्रिपुरारी हा अवतार घेतला. आणि एकाच तिराने तीनही राक्षसांचा वध केला. हा सण वाराणसी आणि अयोध्येत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी भक्तगण गंगेच्या पवित्र जलामध्ये स्नान करतात आणि संध्याकाळी घाटावर तसेच आपल्या घरात तेलाचे दिवे लावतात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी