Numerology: भाग्यांक 5 आणि 6 असलेले लोक प्रेमाच्या बाबतीत असतात असे...जोडीदार निवडताना हे घ्या लक्षात

Numerology 2022 : अंकशास्त्रानुसार (Numerology) भाग्यांक 5 आणि 6 यांचा आपसातील संबंध कसा असेल हे जाणून घेण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. या दोन्ही भाग्यांकाच्या लोकांनी लग्न (Marriage) करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. भाग्यांक 6 चे उत्स्फूर्त व्यक्तिमत्व क्रमांक 5 ला खूप ईर्ष्यावान बनवू शकते. परिणामी प्रेम करणे कठीण होऊ शकते. शिवाय हे देखील महत्त्वाचे की भाग्यांक 6 समजणे कठीण आहे.

Numerology
अंकशास्त्र 
थोडं पण कामाचं
  • अंकशास्त्रात भाग्यांचे महत्त्व
  • भाग्यांक 5 आणि 6 असलेल्यांनी लग्न करताना काय करावे
  • दोन्ही भाग्यांकाची वैशिष्ट्ये पाहा

Numerology : नवी दिल्ली : अंकशास्त्राचे महत्त्व अनेकजण मानतात. अंकशास्त्रात भाग्यांकाला (Radix) मोठे महत्त्व असते. अंकशास्त्रानुसार (Numerology) भाग्यांक  5 आणि 6 यांचा आपसातील संबंध कसा असेल हे जाणून घेण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. या दोन्ही भाग्यांकाच्या लोकांनी लग्न (Marriage) करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. हे दोन भाग्यांक असलेले लोक सामाजिक, भावनिक असतात. शिवाय ते मिसळणे आणि पार्टीचा आनंद लुटतात. मात्र इथे हे लक्षात घेतले पाहिजे भाग्यांक 6 चे उत्स्फूर्त व्यक्तिमत्व क्रमांक 5 ला खूप ईर्ष्यावान बनवू शकते. परिणामी प्रेम करणे कठीण होऊ शकते. शिवाय हे देखील महत्त्वाचे की भाग्यांक 6 समजणे कठीण आहे. दोन्ही अंकांची स्वतःची खास वैशिष्ट्ये असली तरी त्यांना एकसमान जीवनशैली आवडते असे नाही. भाग्यांक 5 आणि 6 असणारे जोडीदार म्हणून कसे असतात ते जाणून घेऊया. (Know how Radix 5 and 6 behave in love before getting married) 

अधिक वाचा : रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे आहेत सोपे उपाय

भाग्यांकाचे महत्त्व

अंकशास्त्राच्या जाणकारांनुसार भाग्यांक 5 आणि 6 या दोघांमधील नातेसंबंध फारसे अनुकूल नसतात. मात्र जर दोघांनी एकमेकांना समजून घेत तडजोड करण्याची तयारी दाखवली तर ते यशस्वी जोडपे बनू शकतात. त्याचबरोबर हे दोघेही लोक संवाद साधण्यास आणि एकत्र काम करण्यास सक्षम असतील तर ते दीर्घकालीन टिकणारे नातेसंबंध तयार करण्याची शक्यता जास्त असते.

भाग्यांक 5 आणि 6 चे व्यक्तिमत्व ज्या पद्धतीचे असते त्यात ते अत्यंत कामुक आणि शारीरिक संबंध ठेवणारे असू शकतात. मात्र त्यामुळेच दोघांनीही फसवणूक आणि अती प्रेम टाळावे. या प्रकारची व्यक्ती खूप धैर्यवान असते. त्यामुळे त्याला अंत्यत सहनशील जोडीदाराची आवश्यकता असते.  म्हणूनच या दोघांनी एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे.

अधिक वाचा : प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता? मग हे वाचाच...

दोघांचे गुणविशेष

भाग्यांक 5 आणि 6 मधील नाते हे आदर्श किंवा सोपे नसते. मात्र काही परिस्थितीत दोघेगी चांगली कामगिरी करू शकतात. जोपर्यंत दोघेही तडजोड करण्यास आणि एकत्र काम करण्यास तयार असतात, तोपर्यंत त्यांच्यामध्ये एक मजबूत आणि प्रेमळ नाते टिकून राहण्याची शक्यता असते. मात्र त्यासाठी या दोन्ही भाग्यांकानी नात्यात चांगले संतुलन बनवणे आवश्यक असते. 

एकत्रितरित्या दोघेही एकमेकांचे सामर्थ्य, मुक्त मन, धैर्य आणि स्वातंत्र्याकडे आकर्षित होतात. भाग्यांक 6 रूपात जोडीदार  मिळणे म्हणजे प्रगती करणे आणि पुढे जाण्यासाठी योग्य स्थिती असण्यासारखे आहे.

अधिक वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती फोनवर कशा प्रकारे बोलते?

आपला भाग्यांक कसा जाणावा

जाणकारांच्या मते, अंकशास्त्रानुसार, दोन व्यक्तींमधील संबंध कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी दोघांचे भाग्यांक माहिती असणे आवश्यक असते. यासाठी त्या व्यक्तीची जन्मतारीख, महिना, वर्ष या सर्व अंकांची बेरजी करून शेवटी त्याला एकक संख्येत किंवा एका अंकावर आणा. उदाहरणार्थ समजा एखाद्याची जन्मतारीख 12 जानेवारी 1995 असेल तर त्याचा भाग्यांक पुढीलप्रमाणे असेल-
(1+2)+1+(1+9+9+5)= 3+1+24=28 आणि 28 म्हणजे 2+8=10 म्हणजे 1.
 
(डिस्क्लेमर  : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाऊ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. टाइम्स नाऊ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी