Numerology 2022: मूलांक ८ असलेल्या व्यक्तींसाठी कसे असणार आहे वर्ष २०२२

धर्म-कर्म-भविष्य
Updated Dec 28, 2021 | 18:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Numerology Prediction 2022: संख्यांची उर्जा आणि प्रभाव आपल्या दैनिक जीवनात महत्त्वाची भूमिका निभावतात. प्रत्येक अंक व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव टाकत असतो. अंक ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया की वर्ष २०२२हे सर्व अंकासाठी कसे असणार आहे. 

numerology
मूलांक ८ असलेल्या व्यक्तींसाठी कसे असणार आहे वर्ष २०२२ 
थोडं पण कामाचं
  • ज्यांची जन्मतारीख, ८, १७, २६ असते त्यांचा मूलांक ८ असते.
  • २०२२ वर्षात तुम्ही उद्योगी राहाल.
  • विद्यार्थ्यांना आपले लक्ष्य प्राप्त करण्यासाठी मोठी मेहनत करावी लागेल.

मुंबई: नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या भविष्याबाबत(horoscope) जाणून घेण्याची इच्छा असते. प्रत्येक व्यक्तीच्या मनात याबाबत जिज्ञासा असते. ही जिज्ञासा नोकरी, विवाह संबंध आणि अनेक गोष्टींशी संबंधित असतात. अशातच अंक ज्योतिषानुसार(numerology) प्रत्येक अंक कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतो आणि या कारणामुळे प्रत्येकाचे महत्त्व असते. सअंक ज्योतिषानुसार जाणून घेऊया मूलांक ८ असलेल्या व्यक्तींसाठी कसे असणार हे वर्ष २०२२..know how will be year 2022 for moolank 8 persons

मूलांक ८

वर्ष २०२२ मूलांक ८ असलेल्या व्यक्तींसाठी साहसिक अभियान असेल. नवीन मार्ग शोधाल आणि काहीतरी मिळवण्याचे लक्ष्य ठेवाल.  अंक ज्योतिषानुसार तुम्ही आतून स्वतंत्र आणि तणावमुक्त जगाल. तुम्हाला जीवनशैलीत बदल करावासा वाटेल. वर्षाच्या अखेरीपर्यंत तुम्ही आसपासच्या  जगात बदल अनुभवाल. नव्या लोकांशी भेटीगाठी होतील. नवे मित्र बनवाल. मित्रांसोबत चांगले क्षण अनुभवाल. 

२०२२ वर्षात तुम्ही उद्योगी राहाल. नवीन ठिकाणी गुंतवणूक कराल. सोबतच व्यापारात नव्या योजना अंमलात आणाल. ज्यामुळे फायदा होईल. आपले लक्ष्य गाठण्यासाठी नेहमी उत्साहित राहाल. ज्या व्यक्ती नोकरी करतात त्या व्यक्ती आपली योग्यता सिद्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. तुम्हाला व्यक्तीगत आणि व्यवसायिक जीवनात समतोल राखणे गरजेचे आहे. 

विद्यार्थ्यांना आपले लक्ष्य प्राप्त करण्यासाठी मोठी मेहनत करावी लागेल. प्रयत्नांनी यश गाठता येईल. कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी चांगलीसंधी आहे. तुम्ही लक्ष केंद्रित करास. करिअरसाठी वरदान प्राप्त होईल. वर्षाच्या सुरूवातीला तुम्ही थोडे व्यस्त असाल ज्यामुळे प्रियजनांसाठी वेळ काढू शकणारनाहीत. दरम्यान, वर्षाच्या मध्य कालावधीपर्यंत तुम्ही गोष्टी चांगल्या पद्धतीने करण्यास सक्षम व्हाल. कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तसेच वर्क लाईफवरही लक्ष द्या. 

अंकशास्त्रानुसार आहार

 प्रत्येक अंक तुमची वागणूक, विचार आणि आरोग्यावर प्रभाव टाकत असतात. त्यामुळे तुमच्या अंकानुसार तुम्हाला बदलणे गरजेचे असते. विशेष करून तुमच्या खाण्यापिण्याबाबत तुम्हाला अधिक सजग राहिले पाहिजे. जर तुम्ही तुमच्या मूलांकानुसार तुमचा आहार घेतलात तर तुम्ही फिट राहू शकता. 

मूलांक ८ - मूलांक ८ असलेल्या व्यक्तींनी भरपूर फळे खाल्ली पाहिजेत. तसेच मोसमात येणाऱी फळे आणि भाज्याही खाल्ल्या पाहिजेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी