Money Plant: मनी प्लांट चोरी करून लावल्याने होतो पैशांचा पाऊस? वास्तुशास्त्र काय सांगते घ्या जाणून...

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jul 15, 2022 | 12:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vastu Tips: वास्तुशास्त्रात घरात सुख-समृद्धी येण्यासाठी तसेच धन प्राप्तीसाठी अनेक उपाय सांगितले आहेत. यातील एक म्हणजे घरात वास्तुनुसार झाडे लावावीत. मनी प्लांट हे एक असे झाड आहे जे प्रत्येक घरात आढळते. मात्र तुम्हाला माहीत आहे मनी प्लांट लावताना काही गोष्टींचे ध्यान ठेवणे गरजेचे असते.

money plant
मनी प्लांट चोरी करून लावल्याने होतो पैशांचा पाऊस? 
थोडं पण कामाचं
  • वास्तुशास्त्रात मनी प्लांट लावण्याचे काही नियम सांगितले आहेत.
  • मनी प्लांट योग्य दिशेला लावणे गरजेचे असते.
  • मनी प्लांटचे झाड कुठे आणि कसे लावावे याचे विशेष नियम सांगितले आहेत.

मुंबई: मनी प्लांटचे(money plant) झाड आपल्या नावानुसार काम करते. वास्तुशास्त्रात(vastu shastra) मनी प्लांटच्या झाडाचे विशेष महत्तव आहे. या झाडाला घरात अथवा बाहेर जर वास्तु नियमानुसार लावले तर व्यक्ती रोडपतीवरून करोडपती होण्यास वेळ लागत नाही. मात्र जर काही गोष्टींचे ध्यान ठेवले नाही तर याचे विपरित निकाल लागू शकतात. know the all rules of money plant

अधिक वाचा - जावई म्हणाला सासूला तुम्हीच नांदायला चला, यानंतर घडल 'असं'

वास्तुशास्त्रात मनी प्लांट लावण्याचे काही नियम सांगितले आहेत. मनी प्लांट योग्य दिशेला लावणे गरजेचे असते. मनी प्लांटचे झाड कुठे आणि कसे लावावे याचे विशेष नियम सांगितले आहेत. त्यानुसार हे लावल्यास याचा फायदा होतो नाहीतर हे नुकसानदायक ठरू शकते. 

मनी प्लांट लावण्याचे फायदे

  1. वास्तु तज्ञांच्या मते जर मनी प्लांटची वेल घरात लावली यामुळे घरात सुख-समृद्धी येते. असे मानले जाते की घरात जितका याचा विस्तार जितका जास्त होतो तितका धनलाभ होतो. 
  2. मनी प्लांट नेहमी आग्नेय दिशेला लावावे त्यामुळे हे झाड आपल्या नावाप्रमाणे रिझल्ट देते. यामुळे आग्नेय दिशेचे दोष दूर होतात. सोबतच घरात सकारात्मकता येते. 
  3. मनी प्लांटच्या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. हे झाड लावल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो. याला आग्नेय दिशेला लावले जाते. या दिशेचे देवता गणपती आणि प्रतिनिधी शुक्र. 

मनी प्लांटमुळे होणारे नुकसान

  1. मनी प्लांट जर योग्य दिशेला लावले नाही तर त्या व्यक्ती आर्थिक तंगी सहन करावी लागू शकते. त्यामुळे चुकूनही मनी प्लांट उत्तर-पूर्व दिशेला लावू नका. 
  2. मनी प्लांटबाबत ही अंधश्रद्धा आहे की मनी प्लांट नसांवर परिणाम करते. असे मानले जाते की याचे वरच्या दिशेला वाढणे शुभ फलदायी असते. तर खालच्या दिशेला वाढणे नुकसानदायक असते. 
  3. अशी मान्यता आहे की मनी प्लांट कोणाला लावण्यास दिले तर यामुळे घराची वाढ खुंटते. 

अधिक वाचा - भारतातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण केरळमध्ये

चोरी केलेले मनी प्लांट लावावे की नाही

मनी प्लांटबाबत अनेकदा लोकांकडून असे ऐकले जाते की जर घरात मनी प्लांट चोरी करून लावले तर यामुळ खूप धनलाभ होतो. याबाबत वास्तु तज्ञांनी कोणताही दुजोरा दिलेला नाही. यामुळे चोरी करून मनी प्लांट लावू नका. सोबतच मनी प्लांट काचेच्या बाटलीतही लावू नका. 

(Disclaimer: येथे देण्यात आलेली ही माहिती सामान्य मानता तसेच माहितीच्या  आधारे आहे. Times Now Marathi याला दुजोरा देत नाही. )

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी