मुंबई: प्रत्येक व्यक्ती झोपेत स्वप्ने(dreams) पाहतो. काही लोकांना जाग आल्यानंतरही स्वप्ने लक्षात राहतात तर काहीजण झोप(sleep) उघडताच स्वप्ने विसरून जातात. स्वप्न शास्त्राच्या(dream astrology) मते कोणतेही स्वप्न हे अकारण नसते प्रत्येक स्वप्नामागे काही ना काही कारण असते. तर भविष्यात घडणाऱ्या घटना जोडलेल्या असतात. अनेकदा स्वप्ने ही भविष्यात होणाऱ्या घटनांचे पूर्वानुमान असतात तर अनेकदा आपल्या डोक्यात सुरू असलेल्या विचारांचे संकलन असते. स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचे काही ना काही शुभ-अशुभ संकेत असतात. जाणून घेऊया या स्वप्नाबद्दल...know the meaning of dreams
अधिक वाचा - PayTMच्या जागी हे आहे टीम इंडियाचे नवे Title Sponsor
झोपल्यानंतर स्वप्ने पाहणे ही सामान्य क्रिया आहे. स्वप्नात स्वत:ला उडताना पाहणे, हवेत तरंगताना पाहणे, ढगातून पडताना पाहणे, फिल्मी सुपरहिरोप्रमाणे उडणे, उंच बिल्डींगवरून स्वत:ला पडताना पाहणे यासारखी स्वप्ने आपल्याला पडत असतात. दरम्यान, स्वप्नशास्त्रानुसार उडणे आणि पडणाऱ्या स्वप्नांमध्ये तुम्ही किती वेगाने उडत आहात याचाही वेगवेगळा प्रभाव असतो.
स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्ही स्वत:ला उंचावरून पडताना पाहत असाल तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. असे स्वप्न मानसिक आणि शारिरीक थकवा दाखवते. या पद्धतीची स्वप्ने तुम्हाला पुरेशी झोप घेण्याचे संकेत देतात. ज्यामुळे तुम्ही होणाऱ्या दुर्घटनापासून वाचू शकता.
एखाद्या वव्यक्तीने स्वप्नात जर एखाद्याला थोबाडीत मारताना पाहिले तर ते शुभ असते का अशुभ. याचे उत्तर हे शुभ संकेत नाहीत. याचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होतेय. याचाच अर्थ तुम्ही विनाकारण एखाद्या वादात अडकू शकता. तसेच शत्रू तुमच्यावर प्रभावी ठरू शकतो. तुमच्याविरुद्ध एखादा कटही रचला जाऊ शकतो. आर्थिक तसेच शारिरीकही नुकसान होऊ शकते. यासाठी सतर्क राहा.
हिंदू धर्मात हत्तीला अतिशय शुभ मानले आहे. वास्तुशास्त्रानुसारही हत्तीला अतिशय शुभ मानले असून घरात हत्तीची मूर्ती ठेवण्याचा सल्ला दिला जातो. स्वप्नात जर हत्ती दिसला तर तुम्हाला केवळ भरपूर पैसेच मिळणार नाहीत तर मान-सन्मानही मिळणार आहे.
स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्ही स्वत:ला उंचावरून पडताना पाहत असाल तर याचा अर्थ तुमच्या जीवनात महत्त्वाचे बदल होत आहेत. तर दुसरीकडे जर तुम्ही स्वत:ला कमी वेगाने आकाशातून अथवा ढगातून पडताना पाहत असाल तर याचा अर्थ तुम्ही स्वत:मध्ये काही नवे बदल करण्याचा विचार करत आहात आणि हा बदल तुमच्या खाजगी जीवनाशी निगडित असू शकतो. उंचावरून पडताना स्वप्नात पाहताच तुमचे डोळे उघडत असतील तर याचा अर्थ तुम्ही सतर्क राहणाऱ्या व्यक्ती आहात.
अधिक वाचा - पोलीस भरतीत मैदानात उशीरा आल्याने तरुणीचा विनयभंग
स्वप्नशास्त्रानुसार जर बिझनेसशी संबंधिक एखादी व्यक्ती स्वत:ला उंचावरून पडताना पाहत असेल तर त्याच्या उत्पन्नात घट होणार असल्याचे संकेत असतात. जर घरातल्या महिला असे स्वप्न ुपाहत असतील तर त्यांच्या पतीच्या उत्पन्नात घट होणार असल्याचे दर्शवतात.