Fruits Dream: स्वप्नात ही ७ फळे दिसल्यास काय आहे त्याचा अर्थ?

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jun 13, 2022 | 12:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

Meaning of fruit dream: असं म्हणतात स्वप्नात आलेल्या प्रत्येक फळाचा वेगळा अर्थ असतो. जाणून घेऊया कोणत्या फळाचा काय अर्थ आहे. 

fruits
Fruits Dream: स्वप्नात ही ७ फळे दिसल्यास काय आहे त्याचा अर्थ 
थोडं पण कामाचं
  • पेरू हे अतिशय स्वादिष्ट फळ असते. जर स्वप्नात पेरू दिसला तर याचा अर्थ तुम्ही रोमँटिक लाईफमध्ये प्रवेश करणार असा आहे.
  • जर तुम्हाला स्वप्नात संत्रे दिसणे शुभ मानले जाते. हा सन्मानाचा संकेत समजला जातो.
  • स्वप्नात अननस पाहण्याचा अर्थ म्हणजे तुम्हाला आयुष्यात जी गोष्ट मिळवायची आहे त्यात लवकरच तुम्ही यशस्वी होणार आहात.

मुंबई: प्रत्येकाला वेगवेगळी फळे(fruits) खाण्यास आवडतात. काहींना आंबा(mango) आवडतो तर काहींना द्राक्षे(grapes). ताजी, रसाळ, गोड फळे खाण्यास कोणाला आवडणार नाही मात्र तुम्हाला माहीत आहे की तुमचे स्वप्नात फळे येण्याचा काय अर्थ आहे. तसे तर स्वप्नात दिसणाऱ्या अनेक गोष्टींचा वेगवेळा अर्थ काढला जातो. मात्र स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात गोड फळे दिसणे हे जीवनात चांगल्या बदलाचे संकेत देते. असं मानलं जातं की स्वप्नात गोड फळे पाहिल्याने आयुष्यात सगळं काही चांगले होते. हे सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते. स्वप्नात येणाऱ्या प्रत्येक फळाचा वेगळा अर्थ असतो. 

अधिक वाचा - नाव न घेता विनायक मेटेंचा पंकजा मुंडेंवर निशाणा

Meaning of fruits in dream

स्वप्नात संत्रे दिसणे

जर तुम्हाला स्वप्नात संत्रे दिसणे शुभ मानले जाते. हा सन्मानाचा संकेत समजला जातो. तुम्ही आपल्या नोकरी-पेशा जीवनात उंच पद मिळण्याचे हे संकेत असतात. जीवनात यशस्वी होण्याचे संकेत मानले जातात. 

स्वप्नात पेरू येणे 

पेरू हे अतिशय स्वादिष्ट फळ असते. जर स्वप्नात पेरू दिसला तर याचा अर्थ तुम्ही रोमँटिक लाईफमध्ये प्रवेश करणार असा आहे. असे मानले जाते की स्वप्नात पेरू खाणे याचा अर्थ लव्ह लाईफमध्ये रोमान्सचा गोडवा घोळण्याचे प्रतीक आह. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की तुमचे कोणासोबत तरी चांगले आणि प्रेमसंबंध जुळणार आहेत. 

स्वप्नात केळे पाहणे

केळ्याबाबत असे म्हटले जाते की स्वप्नात केळे पाहण्याचा अर्थ दाम्पत्य जीवन सुखी होणार आहे. स्वप्नात जर तुम्हाला केळे खाताय असे दिसले तर हा खूपच चांगला संकेत आहे की तुम्ही तुमच्या दाम्पत्य जीवनात पूर्णपणे खुश आहात. असं मानलं जातं की तुमचा पार्टनरसोबतचे जीवन आनंदाने व्यतीत होणार आहे. 

अननस पाहणे

स्वप्नात अननस पाहण्याचा अर्थ म्हणजे तुम्हाला आयुष्यात जी गोष्ट मिळवायची आहे त्यात लवकरच तुम्ही यशस्वी होणार आहात. असं मानलं जातं की स्वप्नात अननस दिसणे हा इच्छापूर्तीचा संकेत असतो. 

द्राक्षे दिसणे

स्वप्नात द्राक्षे दिसल्यास याचा अर्थ तुमचे दुख: लवकरच दूर होणार आहे. असं मानलं जातं की स्वप्नात द्राक्षे पाहण्याचा अर्थ तुमच्या शारिरीक आणि मानसिक समस्या दूर होणार आहेत. द्राक्षे अतिशय पौष्टिक फळ आहे जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. 

स्वप्नात बेरीज पाहणे

असे मानले जाते की स्वप्नात तुम्ही बेरीज पाहिल्या अथवा खाताना पाहिल्या याचा अर्थ तुमच्या जीवनात आनंद येणार आहे. यावरून अंदाज लावलाजाऊ शकतो की जीवनात गुडन्यूज मिळणार आहे. तसेच तुम्ही चांगले काम करला आणि याचा तुम्हाला फायदा मिळणार असेल.

अधिक वाचा -  सूर्यदेवाला अर्घ्य देताना घ्या या गोष्टींची विशेष काळजी

स्वप्नात डाळिंब पाहणे

हा एक शुभ संकेत मानला जातो. हे आर्थिक संपन्नतेचे प्रतीक असते. जर तुम्ही स्वप्नात डाळिंब पाहिले तर काही गोष्टी तुमच्या बाजूने होणार हे संकेत असतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी