Lip Moles : नवी दिल्ली : प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर कुठे ना कुठे तीळ (Moles)नक्कीच असतात. शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर असलेल्या तीळचा उपयोग व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व (Personality)आणि भविष्य दोन्ही शोधण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे अनेकांच्या ओठांवर तीळही असतो. अनेक लोक ओठावर तीळ (Lip Moles)असणे शुभ मानतात, परंतु तीळ कोणत्या ओठावर आहे आणि कोणत्या बाजूला आहे यामुळे देखील खूप मोठा फरक पडतो. उदाहरणार्थ, वरच्या ओठाच्या उजव्या बाजूला एक तीळ आणि वरच्या ओठाच्या डाव्या बाजूला तीळ असल्यास दोन्ही व्यक्तींचे भविष्य खूपच भिन्न असते. जर तुमच्याही ओठांवर तीळ असेल तर त्याचा आयुष्यावर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊया. (Know the significance & secrets of moles on our body)
अधिक वाचा : Weekly Numerology Horoscope: या लोकांसाठी वरदान असणार पुढील आठवडा; जाणून घ्या कोण होणार मालामाल
त्याच वेळी, ज्या लोकांच्या खालच्या ओठाच्या मध्यभागी तीळ असतो, ते भावनिक असतात. त्याचबरोबर रागही लवकर येतो, पण ते सहज रडतात. त्याचप्रमाणे तुमच्या खालच्या ओठाच्या डाव्या बाजूला तीळ असेल तर तुम्ही खूप प्रामाणिक व्यक्ती आहात आणि हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
त्याचप्रमाणे, जर तुमच्या वरच्या ओठाच्या मध्यभागी तीळ असेल तर तुम्ही खूप बुद्धिमान व्यक्ती आहात. त्याच वेळी, ज्या लोकांच्या खालच्या ओठाच्या उजव्या बाजूला तीळ असतो, ते खूप मेहनती असतात आणि त्याच वेळी ते दृढनिश्चयी असतात आणि त्यांना आयुष्यात लवकर यश मिळते.
अधिक वाचा : Shukra Pradosh Vrat 2022: ज्येष्ठ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत आज; जाणून घ्या पूजेची पद्धत
ज्या लोकांच्या ओठांच्या डाव्या बाजूला तीळ असतो, ते खूप कामुक असतात. म्हणजेच त्यांच्यात अनेक प्रेमप्रकरणं आहेत. तसेच ज्या लोकांच्या ओठाच्या उजव्या बाजूला तीळ असतो, अशा लोकांना भाग्यवान मानले जाते. त्यांच्यात हिम्मत कधीच कमी पडत नाही.
प्रत्येक माणसाच्या शरीरावर तीळ असतो. पण शरीराच्या कोणत्या भागावर तीळ आहे यावरून माणसाचे नशीब निश्चित होते. ज्या माणसांच्या हातावर तीळ असतो ते नशिबवान असतात असे ज्योतीषशास्त्र सांगते. हाताच्या कोणत्या भागावर तीळ असेल तर नशिबावर काय परिणाम होऊ शकतो हे पण ज्योतीषशास्त्र सांगते. हातावर विशिष्ट ठिकाणी असलेला तीळ लाभदायी असतो तर विशिष्ट ठिकाणी असलेला तीळ त्रासदायक ठरू शकतो. हाताच्या प्रत्येक भागावरील तीळाचा नशिबावर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. अर्थात यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे योग्य ठरते.
डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते अधिक महितीसाठी तज्ज्ञांची मदत घेऊ शकतात. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.