Chanakya Niti: प्रत्येकाला चांगल्या आयुष्यात एका जीवनसाथीची गरज असते. जीवनात चांगला जीवनसाथी मिळाला तर आयुष्य आनंदी होते, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. यासाठी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात सुखी वैवाहिक जीवनाबाबत अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. ज्यांचे पालन केल्याने वैवाहिक जीवन समृद्ध होवू शकते. कारण ते म्हणतात की लग्नाआधी जीवनसाथीबद्दल आपण जाणून घेतले पाहिजे. त्यो कोणत्या गोष्टी आहे हे आपण समजून घेवूया...
रागामुळे कोणत्याही माणसाचे नातेसंबध नष्ट होवू शकतात. त्यामुळे मित्रही शत्रू होतात आणि माणूस विचार न करता चुकीचे निर्णय घेतो. रागामुळे कोणतेही वैवाहिक जीवन नरक बनते. अशा परिस्थितीत लग्नाआधी जोडीदाराच्या रागाची परीक्षा घेणे गरजेचे आहे.
अधिक वाचा : श्री रामाच्या नावावर ठेवा आपल्या मुलाचं नाव
चाणक्याच्या निती शास्त्रानुसार, कोणत्याही माणसामध्ये संयम खूप महत्त्वाचा असतो. हा एक असा गुण आहे, जो एखाद्या व्यक्तीला कोणत्याही गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करते आणि चुकीचे निर्णय घेण्यापासून थांबवते. अशा वेळी जेव्हाही तुम्ही तुमचा जीवनसाथी निवडाल तेव्हा या गुणाकडे विशेष लक्ष द्या.
चाणक्य नीतीनुसार, जेव्हा तुम्ही कोणाशी लग्न करण्याचा निर्णय घेत असाल, तेव्हा सर्व प्रथम त्यांचे गुण पहा, त्यांचे सौंदर्य नाही. तो कसा दिसतो यापेक्षा तो कसा आहे हे पहा. कोणत्याही व्यक्तीचे सौंदर्य हे त्याचे संस्कार असतात. तेव्हा रूपापेक्षा गुणाला महत्व द्या.
अधिक वाचा : स्वप्नात आपल्या प्रेयसी किंवा प्रियकराला पाहून शुभ की अशुभ
आचार्य चाणक्य म्हणतात की, मनुष्याने धार्मिक असणे अत्यंत आवश्यक आहे. धार्मिक व्यक्ती संयमी असतो आणि आपल्या जीवनसाथीसोबत कायम विश्वासू संबध ठेवतो. म्हणून लग्नापूर्वी तुमचा जीवनसाथी किती धार्मिक आहे हे पाहणे गरजेचे आहे.
अधिक वाचा : रिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, नाहीतर होईल मोठं नुकसान
आचार्य चाणक्य यांच्या मते, जेव्हाही तुम्ही एखाद्या स्त्रीशी किंवा पुरुषाशी विवाह करण्याचा विचार कराल तेव्हा तुम्ही त्यांचे गुण तपासले पाहिजेत. स्त्रीने सद्गुणी असणे खूप गरजेचे आहे तर पुरुषाने संयमी आणि शांत असणे. सौंदर्य नेहमीच तुमच्यासोबत असते असे नाही, पण एक सद्गुणी स्त्री किंवा पुरुष तुमच्या प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंबाची आणि तुमची काळजी घेते.